रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणे आणि त्यांना घरी पोहोचविण्याकरिता सध्या स्कूल बसची व्यवस्था काही शाळा स्वत: करतात. ज्या शाळेकडून अशी व्यवस्था करण्यात येत नाही तिथे विद्यार्थ्यांना पोहोचविण्याकरिता खासगी व्हॅनचा वापर करण्यात येतो. या खासगी व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी राबविलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता असलेल्या या वाहनांची स्कूल बस म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंद असते. या वाहनांत नियमानुसार काही प्राथमिक सुविधा देत विद्यार्थ्यांची संख्या ठरविल्या जाते. परवानगीच्या वेळी नियमाचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेणाºया चालकांकडून प्रत्यक्षात मात्र नियमांचे उल्लंघन होते. वर्धेतील विद्यार्थ्यांना पोहोचविणाºया या स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्या जात आहे. यामुळे अशा वाहनांची तपासणी करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई गरजेची झाली आहे.वयानुसार ठरते विद्यार्थी बसविण्याची संख्याउपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार वाहनात विद्यार्थ्यांच्या वयानुयार बसविण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगीत धावत असलेल्या वाहनात साधारणत: सहा प्रवासी आसन व्यवस्था आहे. या वाहनात १२ वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी असल्यास नऊ आणि १२ वर्षांपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी असल्यास सहा विद्यार्थी बसविण्याचा नियम आहे. मात्र येथे नियमांना डावलून यापेक्षा अधिक विद्यार्थी बसविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. एका वाहनात १० पेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.शहरातील साधारणत: बहुतांश शाळा सकाळच्या वेळी असल्याने एका वाहनात विविध शाळेचे सुमारे २० विद्यार्थी बसविल्या जात आहे. याकडे मात्र वाहतूक पोलिसांसह उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयाचे दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई गरजेचे आहे.कामांची व्यस्ततेमुळे पालकांकडे नसलेला वेळ आणि घर ते शाळेतील वाढते अंतर यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्कूल बसचा वापर होतो. स्कूल बसचा वाढता वापर हा आज व्यवसाय झाला असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन झाला आहे. यात पालकांकडून आपल्या घराजवळ वा परिचित व्यक्तीला पसंती देत आपल्या पाल्याला शाळेत नेणे आणि आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवितात. ही जबाबदारी देताना पालकांकडून वाहन मालकाला नियमांबाबत कधी विचारणा करण्यात येत नाही. एका वाहनात किती विद्यार्थी बसविले पाहिजे याचा नियम पालकांना कदाचित माहीत नसावा. कधी त्यांनी तशी तसदीही घेतली नाही.आरटीओंंची तपासणी संशयाच्या भोवºयातउपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन कर्मचाºयांचे पथक शहरात दररोज स्कूल बसच्या तपासणीकरिता कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे पथक कार्यरत असताना स्कूल आॅटोची जिल्ह्यात परवानगी नसताना त्यांच्यावर किंवा नियमांपेक्षा अधिक विद्यार्थी बसविणाºया स्कूल व्हॅनवर कुठलीही कार्यवाही करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. या पथकाकडून रस्त्याने धावणाºया स्कूल व्हॅनमध्ये नियमानुसार आवश्यक सुविधा आहेत अथवा नाही, याची तपासणी होत नसल्याचेही वाहनांची पाहणी करताच उघड होते. विद्यार्थ्यांना शाळेत नेणाºया अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून आले आहे. चालकाच्या शेजारी असलेल्या सिटवर एकमेकांच्या मांडीवर विद्यार्थी बसून असल्याचे दिसून आले आहे. यातूनच अपघाताची शक्यता बळावत आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.स्कूल व्हॅन म्हणून शहरातील रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांची तपासणी करण्याकरिता दोन अधिकाºयांचे पथक निर्माण करण्यात आले आहे. शाळेच्या काळात वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी या पथकाला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून तशी कार्यवाही सुरू आहे. त्यांना या संदर्भात कडक कारवाई करण्यासंदर्भात पुन्हा सूचना करण्यात येईल.- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा .
स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 10:22 PM
विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणे आणि त्यांना घरी पोहोचविण्याकरिता सध्या स्कूल बसची व्यवस्था काही शाळा स्वत: करतात.
ठळक मुद्देउप प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष : अनेक वाहनांतून आवश्यक सुविधाही बेपत्ता