शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

बहुतांश पक्षी निसर्गशेतीला उपकारकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:15 PM

ऑनलाईन लोकमतवर्धा : निसर्गशेतीमध्ये पिकांच्या संरक्षणात पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी धुरे नष्ट न करता शेतबांधावर झाडे लावावित. जेणे करून पक्ष्यांचे थांबे वाढतील आणि इतर उपयुक्त प्राण्यांचाही वावर वाढेल. या जीवांमुळे पिकांना फारशी हानी न होता शेतीसाठी अपायकारक ठरणाऱ्या किटकांचा ऱ्हास ते करतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांनी केले. ...

ठळक मुद्देमारूती चितमपल्ली : रोठा येथे पक्षीमित्र मेळाव्याचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतवर्धा : निसर्गशेतीमध्ये पिकांच्या संरक्षणात पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी धुरे नष्ट न करता शेतबांधावर झाडे लावावित. जेणे करून पक्ष्यांचे थांबे वाढतील आणि इतर उपयुक्त प्राण्यांचाही वावर वाढेल. या जीवांमुळे पिकांना फारशी हानी न होता शेतीसाठी अपायकारक ठरणाऱ्या किटकांचा ऱ्हास ते करतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांनी केले. बहार नेचर फाऊंडेशनद्वारे रोठा येथे आयोजित शेतकरी पक्षीमित्र मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.रोठा येथील अ‍ॅग्रो थिएटरच्या परिसरात शेतकऱ्यांकरिता मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्घाटन मारूती चितमपल्ली यांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपवनसंरक्षक दिगंबर पगार होते. मंचावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई येथील संशोधक व पक्षीतज्ज्ञ डॉ. राजू कसंबे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.उद्घाटनपर भाषणात मारूती चितमपल्ली यांनी निसर्गशेतीमधील पक्ष्यांचे स्थान अधोरेखित करतानाच नवेगावबांध येथील वास्तव्यात माधवराव पाटील यांनी केलेल्या बेडूक संवर्धन प्रयोगाचीही माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात दिगंबर पगार यांनी काळानुसार पिकांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला.मेळाव्यात डॉ. राजू कसंबे यांनी ‘शेतातील पक्षी’ या विषयाची एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विस्तृत माहिती दिली. अनेक पक्षी बिजाहारी असले तरी ते शेतातील अभ्या पिकांवरचे धान्य खात नसून काढणीनंतर पडणारे दाणेच टिपतात. काही पक्षी हे पिकाला लागणाऱ्या अळीचे आणि कीटकांचे भक्षण करतात. त्यामुळे सरसकट सर्वच पक्ष्यांना नुकसानकारक शत्रू न मानता कीटकांवर नियंत्रण ठेवणारे आपले मित्र पक्षी कोणते हे ओळखण्याची गरज त्यांनी विषद केली.द्वितीय सत्रात अमरावती येथील डॉ. जयंत वडतकर म्हणाले, परंपगरागत अधिवास व जुने वृक्ष नष्ट्र केल्याने तेथील अनेक सजीवांचे जीवन संपुष्टात येते. मानवीय विकासाच्या या अतिलालसेला पक्षीही बळी पडत असून हा देखील मानव व वन्यजीव संघर्षच होय. तृतीय सत्रात पिपरी बजाज कृषी महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र खर्चे यांनी मित्रकिटकांविषयी माहिती दिली. चौथ्या सत्रात डॉ. गोपाल पालीवाल यांनी मधमाशांचे शेतकी जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.प्रारंभी मेळाव्याच्या आयोजनाबाबत बहारचे सचिव दिलीप विरखडे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल कुबडे यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रा. किशोर वानखडे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. बाबाजी घेवडे, जयंत सबाने, वैभव देशमुख, राहुल तेलरांधे, यांनी दिला. आभार दीपक गुढेकर यांनी मानले.मेळाव्यानंतर परिसरातील पक्ष्यांची ओळख करून घेण्यासाठी शिवार फेरी काढण्यात आली. यावेळी शेतातील लहान वृक्षावर मधमाशांच्या घरट्याचे रोपणही करण्यात आले. परिसरात आढळणाºया विविध पक्ष्यांची माहिती देणारी छायाचित्रेही मेळाव्याच्या प्रांगणात लावण्यात आली होती. मेळाव्याला प्रा. भास्कर इथापे, मुरलीधर बेलखोडे, निरंजना व अशोक बंग, आरती व पंकज घुसे यांच्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ येथील पक्षीमित्र, शेतकरी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आयोजनात अ‍ॅग्रो थिएटरचे हरिश इथापे, बहार नेचर फाऊंडेशनचे रवींद्र पाटील, पराग दांडगे, दर्शन दुधाने, अविनाश भोळे, सुभाष मुडे, राहुल वकारे, हेमंत धानोरकर, तारका वानखडे, डॉ. सुप्रिया गोमासे, पार्थ वीरखेडे, नम्रता सबाने आदींचे सहकार्य लाभले.