लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ते भारतीय स्टेंट बँक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्या वतीने बचत गट महामेळाव्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर भारतीय स्टेट बँकेचे राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार, महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार, भारतीय रिजर्व बँक नागपूर एपआयडीडीचे सहा. महाव्यवस्थापक एस. अग्रवाल, एम.एस.आर.एल.एम. मुबंईचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक बिरेंद्र कुमार, भारतीय स्टेट बँक झोन १ नागपूरचे उप महाव्यवस्थापक एम.वी.आर. रविकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महिला बचत गटाना बँकेकडून खेळते भांडवल मिळते, म्हणुन केवळ कर्ज न घेता मिळालेल्या कर्जाचा व्यवसायासाठी उपयोग करुन बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे. यामुळे गटातील महिलांचा विकास होण्यास मदत होईल. यासाठी बचत गटानी शेळी पालन, कुकुटपालन, गोपालन, सामूहिक शेती सारखा व्यवसाय करावा. तसेच घरगुती लघु उद्योग सुरुकरावा. ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर बँक नसलेल्या २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये बँके मार्फत ग्राहक सेवा प्रतिनिधीची नियुक्ती करण्याच्या सुचना यावेळी नवाल यांनी दिल्या. तसेच इतर बँकांनी बचत गटांना कर्ज मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे असेही सांगितले.केवळ कर्ज देणे एवढेच बँकेचे सिमित उद्दिष्ट नसून महिला बचत गटाच्या माध्यमाने महिलांचा आर्थिक विकास करणे हा उद्देश आहे. २ हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये बँक असावी हे रिजर्व बँकेचे धोरण आहे. त्यामुळे २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना तसेच बचत गटांना बँकेच्या सेवा घरपोच मिळणार आहे, असे अजयकुमार यांनी सांगितले. तसेच बचत गटातील महिलांनी विमा योजना, स्वास्थ योजना, पेंशन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्याच्या बचत गटाच्या चळवळीत जिल्हाधिकारी हे प्रेरणास्थान आहे. त्यांनी बचत गटासाठी केलेली कामे उल्लेखनिय आहे. एम.एस.आर.एल.एम. च्या सहाय्याने राज्यात ४० लाख महिलांना जोडले असून यामध्ये जिल्ह्यातील १२ हजार महिला बचत गटाचा समावेश आहे. यात १४ लाख महिला कार्यरत आहे. जिल्ह्यातील ७१४ गटांना भारतीय स्टेट बँकेच्यावतीने ११ कोटी ४० लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.एमएसआरएलएमच्या सहाय्याने मोठ्या कंपन्यासोबत बचत गटाच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी करार करण्यात आलेला असून गटांनी चांगल्या प्रतिच्या मालाचे उत्पादन केल्यास कंपनीच्या सहायाने मोठ्या शहरामध्ये बचत गटाच्या मालाला चांगला भाव मिळेल. यासाठी बचत गटांनी चांगल्या प्रतिच्या मालाचे उत्पादन करावे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते तिसरा टप्पा पार करणाऱ्या महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ भोतमांगे, मनीष कावळे, अमोल भागवत, कल्पना बोस, सुकेशनी पाथडे, तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा शेवडे, विलास झोटींग, वर्षा कोहळे आदींची उपस्थिती होती.
चूल-मूल सांभाळणारी महिला बचतगटांमुळे उद्योजक झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:15 PM
पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
ठळक मुद्देशैलेश नवाल : उमेदचा विशेष कार्यक्रम