लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पती-पत्नीच्या नेहमीच्या वादातून महिलेने सोळा महिन्याच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी धाव घेऊन महिलेला सुखरुप बाहेर काढले पण, सोळा महिन्याच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पती-पत्नीच्या वादात सोळा महिन्याच्या निरागस बालकाला जिव गमवावा लागल्याची घटना नजिकच्या सावालपूर येथे रविवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरुन पत्नीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.संघर्ष निंबाळकर असे मृत सोळा महिन्याच्या बालकाचे तर प्रिया शैलेश निंबाळकर (२३) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशचे दुसऱ्याशी अनैतिक सबंध असल्याचा आरोप करीत वाद घालायची. रविवारी रात्रीही याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.त्यानंतर साडेअकरा वाजताच्या दरम्यान शैलेश त्याचे वडील उकंडरावही झोपी गेले. रात्री बारा वाजताच्या दरम्यान घरासमोरील विहिरीत उडी घेतल्याचा आवाज आल्याने उंकडराव यांनी घरात बघितले असता प्रिया व संघर्ष दोघेही पलंगावर झोपलेले दिसले नाही. बाहेर त्यांना विहिरीच्या दिशेने कुत्रे जोरजोरात भुंकताना दिसले. त्यामुळे त्यांनी विहिरीकडे धाव घेऊन टॉर्चच्या सहाय्याने विहिरीत बघितले असता चिमुकला संघर्ष पाण्यावर तरंगताना तर सून प्रिया हातपाय हलविताना दिसून आली. त्यांमुळे त्यांनी आरडाओरड केल्यावर नागरिकांनी गोळा होऊन दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. यात प्रिया बचावली पण, संघर्षचा मृत्यू झाला.याप्रकरणी शैलेशने मुलाच्या मृत्यूस पत्नी प्रियाच जबाबदार असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मुलाच्या हत्येला आईच जबाबदार असल्याच्या गुन्हा दाखल करुन प्रियाला अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पिसे व गोपाल डोळे करीत आहे.पती-पत्नीचा वाद विकोपालापतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पत्नी नेहमीच पतीशी वाद घालायची. हा वाद विकोपाला गेल्याने सोळा महिन्याच्या चिमुकल्यासह आपणही आत्महत्या करुन या कटकटीतून मुक्त व्हावे, असा विचार करीत घरातील सर्व मंडळी झोपी गेले असता महिलेने चिमुकल्यासह विहिरीत उडी मारली. सासऱ्याला याची माहिती मिळताच आरडाओरड केल्यावर गावकऱ्यांनी धावाधाव करुन मायलेकांना बाहेर काढले. पण, चिमुकला मृतावस्थेत होता. या घटनेने चिमुकला देवाघरी तर माता कोठडीत गेली.
मातेने घेतला चिमुकल्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM
तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशचे दुसऱ्याशी अनैतिक सबंध असल्याचा आरोप करीत वाद घालायची.
ठळक मुद्देआत्महत्येचा प्रयत्न : पतीच्या तक्रारीवरुन पत्नीला अटक