लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरु असतानाच दुपारी दोन वाजता दरम्यान वणा नदीच्या पात्रात दोन महिलांसह दोन बालक बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी आपल्या हातचे काम सोडून नदीकडे धाव घेत शहानिशा करुन घेतली. घटनेची सत्यता पटल्यानंतर शहरातील गणेशोत्सवावर विरजण पडले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.लाडक्या बाप्पाचे आगमण आणि गौरी विसर्जन एकाच दिवशी असल्याने शास्त्री वॉर्डातील पुरपिडीत वसाहतीतील महिला गौरी विसर्जनासाठी वणा नदीपात्राच्या कवडघाट घाटावर गेल्या होत्या. यात मृत रिया रणजित भगत (३२) यांच्यासोबत त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अभय व तेरा वर्षाची मुलगी अंजना आणि शेजारी राहणाऱ्या दीपाली मारोती भटे (३०) याचा समावेश होता. गौरी पूजनानंतर सर्व महिला गौरीचे विसर्जन करण्याकरिता नदीपात्रात उतरल्या. त्यामुळे अभय व अंजनाही नदीच्या पाण्यात गेल्या. पाण्याच्या प्रवाहाने अभय वाहत जाऊ लागल्याने त्याला पकडण्याकरिता अंजना धावली. तीही पाण्याच्या प्रवाहात लागल्याने तिची आई रिया धावली.तेव्हा दोघेही हाती लागले नाही; पण तीही वाहून जातांना दिसताच शेजारी राहणाºया दीपाली भटे यांनी धाव घेतली. मात्र एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही पाण्यात बुडाले. यापैकी रिया भगत ही पाण्यावर तरंगताना दिसल्याने पोलीस शिपायी चकोले यांनी पाण्यात उडी मारुन तिला जिवंत बाहेर काढले; पण, रुग्णालयात नेतांना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणाची माहिती मिळताच ठाणेदार संत्यवीर बंडीवार त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे अधिकारी गंडाईतही आपल्या चमूसह बचाव कार्यासाठी पोहोचले. शहरातील नागरिकांनीही धाव घेत नदीपात्राचा परिसर पिंजून काढला पण, अद्याप तिघांचा थांगपत्ता लागला नाही. आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजु तिमांडे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्यासह स्थानिल पदाधिकाºयांनी बचाव कार्यात सहभागी होऊन मदत कार्याला सहकार्य केले.तब्बल तीन तासांनंतर पोहोचली रेस्क्यू टीमनदीपात्रात दोन महिलांसह दोन चिमुकले बुडाल्याची घटना दुपारी २ वाजतादरम्यान घडली. याची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला सूचना केल्यात.पण, तब्बल तीन तासानंतर हे पथक पोहोचले असून सायंकाळी ६ वाजतापासून शोधमोहीम सुरु करण्यात आली. रात्री अंधार पडू लागल्याने या पथकाला शोधकार्य करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे उशिरापर्यंत अभय, अजंना व दिपालीचा शोध लागला नाही.पूरपीडित वसाहतीत शुकशुकाटमृत रिया रणजित भगत व दीपाली भटे या दोघींचेही पती मोलमजुरी करून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करतात. आजच्या घटनेने भगत परिवारातील सर्वस्व हरपले आहे. तर भटे परिवारातील सावित्री गेल्याने या दोन्ही परिवारावर आभाळ कोसळले आहे. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून ते राहत असलेल्या शास्त्री वॉर्डातील पूरपीडित वसाहतीत शुकशुकाट होता. साऱ्यांचीच धाव नदीपात्राकडे असून दोन चिमुकल्यांसह दीपालीचा शोध घेण्यासाठी नजरा भिरभिरत होत्या.रुग्णालयातील कर्मचारी नशेतनदीपात्रात बुडालेल्या रिया भगत यांना पोलीस कर्मचारी चकोले यांनी जीवंत बाहेर काढले; पण रुग्णालयात नेतांना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात नेण्याकरिता कर्मचाºयांना बोलावण्यात आले. पण, रुग्णालयातील कर्मचारी दारुच्या नशेत असल्याने मृताच्या नातेवाईकांनाच मृतदेह उचलून शवविच्छेदन गृहात न्यावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
चौघे बुडाल्याने हिंगणघाटात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:50 PM
लाडक्या बाप्पाचे आगमण आणि गौरी विसर्जन एकाच दिवशी असल्याने शास्त्री वॉर्डातील पुरपिडीत वसाहतीतील महिला गौरी विसर्जनासाठी वणा नदीपात्राच्या कवडघाट घाटावर गेल्या होत्या. यात मृत रिया रणजित भगत (३२) यांच्यासोबत त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अभय व तेरा वर्षाची मुलगी अंजना आणि शेजारी राहणाऱ्या दीपाली मारोती भटे (३०) याचा समावेश होता.
ठळक मुद्देउत्सवावर विरजण : गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरु असताना घडली घटना, तिघांचा पत्ताच नाही