लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनुदानाच्या मागणीसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनापासून शाळा कामकाज बंद आंदोलन पुकारले. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्वीकारले. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनाही निवेदन देण्यात आले.राज्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांच्या मूल्यांकन निकषाची पूर्तता करून पात्र ठरलेल्या विना अनुदानित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा व तुकड्या एकूण घोषित १४६ व अघोषित १६५६ व पुणे स्तरावरील संपूर्ण याद्या शिक्षणमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी १५ दिवसांत उपसमितीची बैठक घेऊन अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, महिना लोटूनही अनुदानास पात्र याद्या घोषित करण्यात आल्या नाहीत. अनुदानाविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही विषय घेण्यात आला नाही. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. शिक्षकांनी ५ आॅगस्टला विभागीयस्तरावर आंदोलन करून १३ ला शाळा कामकाज बंद करण्याचा इशारा दिला होता.याला विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे सचिव सतीश जगताप यांनीही पाठिंबा दिला आहे. शाळा कामकाज बंद आंदोलनात जिल्ह्यातील विनाअनुदानित घोषित व अघोषित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी होत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला दिले.यावेळी कांचन ढेरे, सुनीता श्यामकुंवर कंचन मुंधडा, विद्या चांभारे, जयश्री राऊत, गजानन गुडधे, प्रा. भजभुजे, प्रा. मुडे, प्रा. बेले, प्रा. बावणे, प्रा. आडे, प्रा. राऊत, प्रा. बैसारे, प्रा. कोसुरकर, प्रा. पाल, प्रा. चतुर, विशाल सबाने यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांचे बेमुदत शाळा कामकाज बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:38 PM
अनुदानाच्या मागणीसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनापासून शाळा कामकाज बंद आंदोलन पुकारले. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देमहिना लोटूनही अनुदान नाही : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन