वर्धा : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली.
तडस म्हणाले, ''सुरुवाती लक्षण दिसत असल्याने कोरोने चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला दिल्लीतील घरामध्ये आयसोलेट करून घेतले आहे.'' माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गडकरी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी आणि स्वत:ला आयसोलेट करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.