आॅनलाईन लोकमतवर्धा : केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचविल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनांना केेंद्रस्थानी ठेऊन तिगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खा. तडस यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला.आपल्या भागातील शेतकऱ्यांकडून काही सूचना असेल तर त्या स्वीकारून त्या सूचना पोहचविण्याचे कार्य करावे अश्या सूचना सर्व खासदारांना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने तिगाव येथे शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर यांच्या सहकार्याने शेतकरी सवांद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जयंत येरावार, जयंत कावळे, सुनील गफाट, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती, गजानन कार्लेकर, जि.प. सदस्य पंकज सायंकार, विमल वर्भे यांची उपस्थिती होती.खा. रामदास तडस म्हणाले की, महाराष्ट्राच्या नैसर्गिक, भौगोलिक स्थानामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती, मधमाशी पालन तसेच पशुपालन क्षेत्रात जोडधंदे करणे शक्य आहे. त्याचबरोबर बागायती शेती, फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. कृषी आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय परस्परांवर आधारित असून परस्परांच्या सोबतीनेच ते विकसीत होतात. छत्तीसगड सारख्या राज्यातील शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले आहेत. त्यांचा आदर्श ठेवल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. खाजगी क्षेत्र व अन्य भागधारकांमध्ये सहकार्य वाढविण्यासह नवे दृष्टिकोण स्वीकारल्यास २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय साध्य करता येईल, असे सांगितले.शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, विद्युत जोडणी, पांदण रस्ते, शासकीय योजनेतून विहीर, कुकुट पालन, शेळी पालन, शेततळ यासाठी भरीव अनुदान सरकारने दिले पाहिजे. तसेच शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही गरजुंना विविध शासकीय योजनांचा लाभ झटपट मिळेल या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतकरी हितार्थ विविध योजना राबवित असून त्याचा लाभ शेतकºयांनी घेतला पाहिजे. पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत प्रत्येक शेतामध्ये पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांनी केले.कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला. शिवाय या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी मागणी केली. सदर शेतकरी सवांद परिषद कार्यक्रमाचे संचालन मिलिंद भेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नंदकिशोर झोटिंग यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध शासकीय योजनांची माहितीही उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध शेतकरी हितार्थ योजनांची माहिती दिली. यावेळी काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या खासदारांसमक्ष मांडल्या. शिवाय सदर समस्या निकाली कशा निघेल यासाठी तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणीही केली.
खासदारांचा शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:32 PM
केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचविल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
ठळक मुद्देतिगावात कार्यक्रम : पंतप्रधानाच्या सूचनेनंतर क्षेत्रात परिषदांचे आयोजन