शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:41 IST

खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे याच प्रकल्पातील सोडलेल्या पाण्याची उचल करून वर्धा शहर व वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना पुरवठा केल्या जातो. शिवाय वर्धेकरांसाठी ‘धाम’ किती महत्त्वाचा आहे, याबाबचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर खासदारांनी धामची पाहणी केली.खा. तडस यांनी खरांगणा (मो.) परिसरातील धामनदीच्या पात्राची पाहणी केली असता पुलाच्या कामादरम्यान माती व मुरुम नदीपात्रामध्ये टाकल्या गेल्यामुळे नदीपात्रातील पाणी वर्धेच्या दिशेने जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच खरांगणा परिसरातील गावांमध्येही भीषण पाणी समस्या असल्याचे लक्षात आले. याकरिता उल्लेखनिय पुर्नजिवनाचे कार्य गरजेचे असल्याचे सांगितले. खा. तडस यांनी धाम प्रकल्पाचा मुख्य कालवा, पिपरी (मेघे) भागाची पाहणी केली. या कालव्याची परिस्थिती वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्राची पाहणी करण्यात आली. नदी पात्राला झुडपांचा विळखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने नदीपात्र अरुंद व उथळ झाल्याचे आढळले. तर नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जात सोडल्या जात असल्याने नदी प्रदुषित होत असल्याचे दिसून आले. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल वर्धा न.प., एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, मध्य रेल्वे, आंजी ग्रा.पं. प्रशासन तसेच नदी तिरावर असलेली गावे करतात. यामुळे येथे उगम ते संगम पुर्नजिवन कार्य गरजेचे असल्याचे याप्रसंगी खा. तडस म्हणाले. त्यानंतर तळेगांव रघूजी या गावाला भेट देण्यात आली. तेथे कुठल्याही प्रकारच्या जलस्त्रोतातून पाणी उपलब्ध नाही असे लक्षात आले. तेव्हा ग्रा.पं.मध्ये ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे सांगण्यात आले. खरांगणा हेटी येथे दोन सिंमेट नाला बांधाची मागणी गावकºयांनी केली. त्यानंतर येळाकेळी धाम उन्नई प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यावेळी वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, राजू राठी, राजश्री राठी, नितीन अरबट, सरपंच रेखा वाघमारे, निलीमा अक्कलवार, नम्रता आंभोरे, तळेगाव रघुजीच्या सरपंच प्रभा कालोकार, उपसरपंच धनराज गहाट, वर्धा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र डाफने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस