लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक सिव्हील लाईन भागातील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे नागरिकांना सदर कार्यालयात ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दररोज विविध कामानिमित्त शेकडो नागरिक येतात;पण सदर दोन्ही कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर पावसाचे पाणी साचून चिखल तयार झाल्याने कार्यालयात ये-जा करणाºयांना तारेवरची कसरत करूनच मार्ग काढावा लागत आहे. चिखलातून ये-जा करताना अनेक नागरिक जमिनीवर पडल्याची बरीच उदाहरणे असल्याने योग्य कार्यवाहीची मागणी आहे.अनुचित घटनेला मिळतेय निमंत्रणचिखलातून मार्ग काढताना अनियंत्रित होऊन जमीनीवर पडून अनेकांना गंभीर स्वरुपाच्या इजा झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. सदर दोन्ही कार्यालयात परिसरातील चिखलाचे साम्राज्य एखाद्या मोठा अनुचित घटनेला आमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी सुजान नागरिकांची आहे.
एसडीपीओसह एसडीएम कार्यालय परिसरात चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:06 AM
स्थानिक सिव्हील लाईन भागातील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे नागरिकांना सदर कार्यालयात ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देनागरिकांना नाहक त्रास : संबंधितांनी लक्ष देण्याची गरज