शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

वर्दळीच्या स्थळी पालिकेचे ‘पे अ‍ॅण्ड पार्क’

By admin | Published: January 09, 2017 1:18 AM

शहरात असलेली पार्कींगची समस्या मार्गी लावण्याकरिता बजाज चौक परिसरात वाहतूक शाखा कार्यालयाच्या

तात्पुरती होणार सुविधा : बजाज चौकात वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वर्धा : शहरात असलेली पार्कींगची समस्या मार्गी लावण्याकरिता बजाज चौक परिसरात वाहतूक शाखा कार्यालयाच्या भिंतीलगत नगर परिषदेच्यावतीने ‘पे अ‍ॅण्ड पार्कींग’ सुविधा सुरू करण्यात आली आहे; पण या पार्कींगमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन चौकात पालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या पार्किंगच्या सुविधेमुळे शहरात अतिक्रमणाला चालना मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. वर्धेत पार्कींगची समस्या गत कित्येक वर्षांपासून आ वासून आहे. यावर मार्ग काढण्याकरिता अनेकवेळा बैठका झाल्या. काही नकाशेही सादर करण्यात आलेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन काही निर्देशही देण्यात आलेत. या निर्देशानुसार काम करण्याची गरज असताना पालिका प्रशासनाच्यावतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यावर काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. विलंबाने का होईना, पालिकेच्यावतीने ही समस्या मार्गी लावण्याकरिता पार्कींग सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मुख्य मार्गावर बजाज चौक परिसरात रस्त्याच्या कडेला पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी या पार्कींग व्यवस्थेमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा विचार पालिका प्रशासनाकडून झाला नसल्याचेच दिसून येत आहे. शहरात वाढत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करणे गरजेचे असताना, रस्ता मोकळा करण्याऐवजी पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करीत पार्किंगची सोय करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भर चौकात करण्यात येत असलेल्या या पार्कींगमुळे शहरात अतिक्रमण करण्याची मुभा तर पालिका देत नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू आहे.(प्रतिनिधी) ४शहरातील बजाज चौकात वाहतूक पोलीस नियमित कर्तव्यावर असतात. येथे त्यांच्याकडून वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. ती वाहने या पार्किंगच्या समोरच उभी राहतात. यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय नागरिकांची पार्कीगची समस्या काही काळ मार्गी काढण्यासाठी असला तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करण्यात आला नसल्याचेच दिसून येत आहे. या पार्किंगला पालिकेची परवानगी ४शहरातील बजाज चौक परिसरात होत असलेल्या या पार्किंगला पालिकेच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. याचे कंत्राट ठाकूर नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्याने येथे काम सुरू केले आहे. या पार्कींगमुळे वाहतुकीची अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांचीच होती मागणी ४वाहतूक शाखेजवळ असलेल्या त्रिकोणी जागेवरून होणारी वाहतूक डोकेदुखी ठरत होती. येथून मोठ्या प्रमाणात आॅटोची वाहतूक होत होती. या अवैध वाहतुकीवर आळा घालण्याकरिता वाहतूक पोलिसांकडूनच या जागेवर पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय कोणत्या जागेपासून कुठपर्यंत पार्कींग करता येईल, याची माहिती व आखणी वाहतूक पोलिसांनीच करून दिली. आणखी आठ ठिकाणी पार्कींगची सोय ४शहरातील पार्कींगची समस्या मार्गी लावण्याकरिता पालिकेद्वारे आणखी आठ ठिकाणी अशी पार्किंगची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शहरात पार्किंगची सुविधा करण्याचे मोठे आव्हान आहे. यामुळे जागा उपलब्ध करून त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यात बजाज चौक परिसरात वाहतूक पोलिसांनीच दिलेली जागा आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनीच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याकरिता त्यांनीच जागेची आखणी करून दिली आहे. अशी व्यवस्था आणखी काही ठिकाणी करण्यात येणार आहे. - अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.