लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. शिवाय कार्यालयाच्या भिंतींना जाळ्याचा विळखा असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी, तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून रस्त्याच्याकडेला कचरा टाकणाऱ्या बेशिस्तांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय पालिकेच्यावतीने ओला व सुका कचरा प्रत्येक घरातून घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आणि कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. मात्र, जे कार्यालय वर्धा शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत शिस्त लावत आहे त्याच वर्धा न. प. कार्यालयातील कर्मचाºयांना कार्यालय व कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न कार्यालयाचा फेरफटका मारल्यावर नागरिकांकडून विचारल्या जात आहे. न. प. कार्यालयाच्या मागील भागात मोठा कचºयाचा ढिगारा मागील काही दिवसांपासून कायम आहे. तसेच कर विभागाकडे जाणाºया मार्गावरील भिंतीवर जाळे कायम असल्याचे दिसते. हा प्रकार स्वच्छ शासकीय कार्यालयाल या हेतूला छेद देणारा असल्याने न.प.तील संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कार्यालयीन कामकाजाबाबत होतोय अपप्रचारन.प.च्या कार्यालयाच्या मागील भागात कचºयाचे ढिगारे कायम आहे. तेथील कचरा वेळीच उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असताना त्याकडे पालिकेतील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर दारूच्या शिश्या पडून असून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना हा प्रकार सहज निदर्शनास पडतो. त्यांच्याकडून उलट-सुलट चर्चा होत आहे.कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यायेथील न. प. कार्यालयाच्या मागणी परिसरात गत काही दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा कायम आहे. इतकेच नव्हे तर या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून असल्याचे दिसते. दारूबंदी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सहज निदर्शनास येत असल्याने कार्यालयाच्या कामकाजाबाबत उलट-सुलट चर्चा नागरिक करीत आहेत.
पालिका कार्यालयाला स्वच्छतेचा विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:45 PM
स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देभिंतींना जाळ्याचा विळखा : परिसरात कचऱ्याचे ढिगारे