लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्रत्यक्ष महाकाळी गाठून जाणून घेतली.महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून उचल करून वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासन तर वर्धा शहराशेजारी १३ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. परंतु, मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे हिवाळ्याच्या दिवसातच धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून वर्धा पाटबंधारे विभागाने केले. तेव्हापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धाम प्रकल्पातून वेळोवेळी उपयुक्त जलसाठा सोडण्यात आला. परंतु, तो आता संपल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी मृत जलसाठ्याची उचल केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी गुरूवारी महाकाली येथील धाम प्रकल्पाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.शिवाय मृत जलसाठ्याची उचल करण्यासाठी काय उपाययोजना आहेत, याची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी नगरसेवक गोपी त्रिवेदी, नगरसेवक सोनल ठाकरे, नगरसेवक कैलास राखडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ, झलके, महावितरणचे अधीक्षक अभियंता वानखेडे, मजिप्राचे उमाडे, मिलिंद बंडीवार, न.प. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार, कुंभारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नगराध्यक्षांनी जाणली ‘धाम’ प्रकल्पाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:38 PM
शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्रत्यक्ष महाकाळी गाठून जाणून घेतली.
ठळक मुद्देमृत जलसाठ्याची होणार उचल : उपयुक्त जलसाठा संपला, जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न