शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सात वर्षीय चिमुकल्याची हत्या करणाऱ्यावर दारूविक्रीचेही गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM

पोलीस सूत्रानुसार, मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महाटोली येथील रहिवासी असलेला विशाल हा काही वर्षांपूर्वी पडेगाव येथे त्याच्या जावायांकडे रहायला आला. दारूचे व्यसन असलेल्या विशालची पती व्यसनाधीन विशालच्या जाचाला कंटाळून त्याला सोडून माहेरी निघून गेली. दरम्यान तो वर्धा येथील तारफैल भागातील रहीम शेख रशीद या दारूविक्रेत्याकडे काम मागायला आला.

ठळक मुद्देआरोपीवर रूग्णालयात उपचार सुरू । शोकाकुल वातावरणात मुलावर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील तारफैल येथे एका सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विशाल गजानन जोगदंड (२६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी उत्तरिय तपासणी झाल्यावर पीडित मुलाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपी विशाल जोगदंड याच्यावर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत.पोलीस सूत्रानुसार, मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महाटोली येथील रहिवासी असलेला विशाल हा काही वर्षांपूर्वी पडेगाव येथे त्याच्या जावायांकडे रहायला आला. दारूचे व्यसन असलेल्या विशालची पती व्यसनाधीन विशालच्या जाचाला कंटाळून त्याला सोडून माहेरी निघून गेली. दरम्यान तो वर्धा येथील तारफैल भागातील रहीम शेख रशीद या दारूविक्रेत्याकडे काम मागायला आला. सुमारे एक वर्ष त्याने दारूविक्रीचा व्यवसाय केला. याच दरम्यान त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये तीन गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. पण नंतर रहीम शेख रशीद याने दारूविक्रीचा व्यवसाय बंद केल्याने विशाल हा पुन्हा बेरोजगार झाला. रहीम शेख रशीद यांच्या मालकीच्या तारफैल भागातील झोपडीत राहून तो सध्या हातमजूरी करून उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी घरासमोर खेळत असलेल्या एका सात वर्षीय मुलाला त्याने चॉकलेटचे आमिष देत स्वत:च्या खोलीत नेले. तेथे त्याने या मुलावर अत्याचार केला. मुलाने आरडा-ओरड केल्यावर सदर बाब एका महिलेच्या लक्षात आली. तिने याची माहिती परिसरातील नागरिकांना देत आरोपीच्या झोपडीकडे धाव घेतली. दरम्यान आरोपीने त्याच्या झोपडीतून यशस्वी पळ काढला. शिवाय तो रेल्वे रुळाच्या दिशेने धावत सुटला. अशातच तो जमिनीवर पडला. त्याच्यावर काही नागरिकांनी लक्ष ठेऊन घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठून विशालला ताब्यात घेतले. शिवाय कुठल्या मुलाचा आवाज महिलेने ऐकला याची शहानिशा करण्यास सुरूवात केली. दरम्यान अर्धनग्न अवस्थेत पीडित मुलाचा मृतदेह आरोपी विशाल याच्या घरातील टाकीत आढळला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४२, ३७७ व २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीची प्रकृती ठिक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप करीत आहे.सामाजिक बांधिलकी जोपासत दिली राहायला जागा !आपल्या दारूच्या अवैध व्यवसायात सहकार्य करणाऱ्या विशाल जोगदंड याला रहीम शेख रशीद यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राहण्यासाठी त्यांच्या मालकीची झोपडी दिली होती. अशातच विशाल यांने त्याच घरात सात वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.पीडित मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून की गळा आवळून?आरोपीने पीडित मुलाची हत्या गळा आवळून केल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच पीडित मुलाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे उलगडणार आहे.आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या - आईची मागणीचॉकलेटचे आमिष देऊन माझ्या सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्याची निर्घुण हत्या करणाºया आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडित मुलाच्या आईने केली आहे.

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कार