शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:29 PM

जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला .

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आजही सापाला आपण वैरी समजतो . परंतु साप हा शेतकऱ्यांसाठी हितकारक समजला जातो . जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला . अजगराने काही तरी गिळंकृत केल असल्याने तो पूर्णपणे फुगला होता. एका शेतकऱ्याने त्याला पाहिले व शेतकऱ्याची भंबेरीच उडाली. त्याने या घटनेची माहिती गावांतील युवकांना कळवली. लगेच गिरड येथील सर्पमित्रांना घटनास्थळी बोलविण्यात आले .

सर्पमित्रांनी मोठया शितफीने सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याला पकडले . अजगराने काहीतरी गिळंकृत केल असल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच सापाच्या तोंडातून भला मोठा कुत्रा मरणासन्न अवस्थेत बाहेर पडला . लगेच ही माहिती सर्पमित्र प्रकाश लोहट , रवि वरघणे , स्वराज वरघणे , रोशन नौकरकर , राकेश बोबडे यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली . गिरड क्षेत्राचे वनाधिकारी एन एस नरडंगे यांनी अजगराची नोंद केली . वनविभागाने सर्पमित्रांना सोबत घेऊन अजगराला मोहंगाव जंगलात सोडून जीवनदान देण्यात आले . साप दिसल्यास सापाला कोणतीही इजा न करता सर्पमित्राना माहिती देण्याचे आवाहन सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष रवि वरघणे यांनी केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsnakeसाप