वर्धा-हिंगणघाट मार्गावरील रायफुली फाट्यानजीकची घटना वर्धा : अंत्यसंस्काराचा विधी आटोपून वर्धेकडे परत येताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी झाले. हा अपघात धोत्रा-रायफुली चौरस्त्यालगत रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झाला. मंगेश संतोष शास्त्रकार (२२) रा. तुकाराम मठ, वर्धा व मीरा शास्त्रकार अशी जखमींची नावे आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, मंगेश व त्याची आई हे दोघे दुचाकी एच ३१ एवाय २८८९ ने हिंगणघाटला नातलगाच्या अंत्यविधीकरिता गेले होते. आनंद राखुंडे यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून वर्धेकडे परत येत असताना हिंगणघाटकडे भरधाव जाणारी कार एमएच ३२ सी ८८०७ ने दुचाकीला धडक दिली. या जबर धडकेत दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात आदळली. यात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. दुचाकीचा चुराडा झाला. घटनास्थळावर उपस्थितांनी दोन्ही जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.(जिल्हा प्रतिनिधी) टँकरची ट्रेलरला धडकसेलू : नागपूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या टँकर एमएच ४६ एफ ४६०९ ने ट्रेलर जेएच ०५ ए ९८१३ ला समोरून धडक दिली. यात टँकर चालक उमेश सोमनाथ कुशवाह हा जखमी झाला. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापूर शिवारात रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडल. याबाबत संदीपकुमार त्रिपाठी रा. तिगरा, जि. सतना (मध्य प्रदेश) याच्या तक्रारीवरून कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला.(तालुका प्रतिनिधी)ट्रक अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्पसेलू : गतिरोधकांकडे ट्रकचालकाचे दुर्लक्ष झाल्याने त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. हा अपघात शनिवारी केळझर येथील मार्गावर रात्री ९.३० वाजता घडला. यात सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती. एमएच १७ एबी ९०७२ ६ा ट्रक नागपूरकडे जात होता. केळझरनजीक रस्त्यावरील गतिरोधक त्याला दिसले नसल्याने नागपूरकडून वर्ध्याकडे येत असलेल्या एमएच ४० वाय ७५६८ या ट्रकला त्याने धडक दिली. यात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले. ऐन रस्त्यावरील या अपघातामुळे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली.(तालुका प्रतिनिधी)
कार दुचाकी अपघातात मायलेक गंभीर
By admin | Published: March 14, 2016 2:05 AM