शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

नाचणगावच्या सरपंचावर गुन्हा दाखल

By admin | Published: April 02, 2016 2:45 AM

नाचणगावच्या सरपंच सुनिता संजय जुनघरे यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायत निवडणूक लढविली.

प्रकरण : निवडणुकीत बनावट दाखल्याचा वापर पुलगाव : नाचणगावच्या सरपंच सुनिता संजय जुनघरे यांनी शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायत निवडणूक लढविली. यात विजयी होवून त्या सरपंच झाल्या. मात्र माहिती अधिकारात त्यांनी सादर केलेला दाखला बनावट असल्याचे समोर आले. यामुळे तक्रारीवरून सरपंचासह त्यांना बनावट दाखला देणारे व शाळेच्या मुख्याध्यापकाची खोटी स्वाक्षरी करणारे त्यांचे पती संजय जुनघरे यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घोडेस्वार यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविल्याने हा बनवाबनविचा प्रकार उघडकीस आला. जि.प.प्राथमिक शाळा आपटी येथील मुख्याध्यापक क्रिष्णा महादेव झाडे यांनी या प्रकरणाची शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच पोलिसातील तक्रारीनुसार सरपंच सुनिता जुनघरे व जि.प. प्राथमिक शाळा आपटी येथील शिक्षक संजय जुनघरे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.शिक्षक संजय जुनघरे यांनी मुख्याध्यापकाची बनावट स्वाक्षरी करून सुनीता जुनघरे (सुनीता ज्ञानेश्वर मून) शाळेत शिकली नसतानाही शाळा सोडल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्राच्या आधारे सुनिता जुनघरे यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून ग्रामपंचायत निवडणूक लढविली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी या पतीपत्नी विरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे नाचणगाव राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. शहर व नाचणगाव वासियांचे लक्ष असलेल्या या प्रकरणी ठाणेदार राजेंद्र शिरतोडे तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)