लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा - शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हैदराबाद कडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T6194 ने गिमा टेक्सटाइलमध्ये कामाला पायदळ जात असलेला कामगार आकाश मोरेश्वर मुन वय २८ वर्ष राहणार हिंगणघाट याला चिरडले. यावेळी ट्रक चालकाने आकाशला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तो त्याला वाचवू शकला नाही. अशातच ट्रक पलटी झाला.
अपघात होताच ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. अपघाताची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. व अपघातग्रस्त ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.
या अपघाता संबंधी अज्ञात ट्रक चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.