शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

दिवसपाळीत नागपूर ते मुंबई नवीन शताब्दी एक्स्प्रेस द्या

By admin | Published: May 08, 2016 2:24 AM

नागपूर ते मुंबईकरिता दिवसकालीन प्रवासी रेल्वेची संख्या नगण्य असून प्रवाश्यांना पुर्णपणे रात्रकालीन प्रवाशी रेल्वेवर अवलंबून राहावे लागते.

रामदास तडस यांचा लोकसभेत अतारांकित प्रश्नवर्धा : नागपूर ते मुंबईकरिता दिवसकालीन प्रवासी रेल्वेची संख्या नगण्य असून प्रवाश्यांना पुर्णपणे रात्रकालीन प्रवाशी रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. विदर्भातील या समस्येवर लोकसभेमध्ये अतारांकित प्रश्न उपस्थित करून नागपूर ते मुंबई पर्यंत शताब्दी एक्स्प्रेम सुरू करावी, अशी मागणी केल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी केल्याचे त्यांनी कळविले आहे.या संदर्भात नागरिकांनी व रेल्वे संघटनांनी नागपूर वरून मुंबईकरिता दिवसकालीन रेल्वे सुरू करण्याबाबत अनेक वेळा मागणी केलेली होती. नागपूर येथून आजपर्यंत मुंबईकरिता कुठल्याच प्रकारची दिवसकालीन प्रवासी रेल्वे सेवा अस्तित्वात नाही. एकही गाडी नसल्याने प्रवाश्यांना नाईलाजास्तव रात्रीतून प्रवास करून मुंबईला जावे लागते. शताब्दी एक्स्प्रेस सेवा भारतीय रेल्वेमध्ये अतीशय महत्त्वाची कामगिरी बजावत असून या सेवेद्वारे पुणे-हैदराबाद, दिल्ली-भोपाल, दिल्ली-कालका, दिल्ली-चंदीगड, मुबई-अहमदाबाद, दिल्ली-कानपूर या सह इत्यादी प्रमुख शहरे जोडलेली आहे. या सेवेचा मुंबई-नागपूर मार्गाकरिता लाभ व्हावा या दृष्टीकोनातून याबाब संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी कळविले आहे. या विषयावर खा. तडस यांनी ना. सिन्हा यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर ना. सिन्हा यांनी सकारात्मक उत्तर देत नागपूर ते मुंबईकरिता दिवसकालीन प्रवाशी गाडी देण्याचे आश्वासीत केल्याचे खासदारांनी कळविले आहे.(प्रतिनिधी) रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितली तांत्रिक अडचण खा. रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, नागपूर-मुंबई शताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत यापूर्वी रेल्वे बोर्ड, महाप्रबंधक कार्यालय, विभागीय रेल्वे कार्यालय अनेक निवेदन प्राप्त झाली आहे; परंतु नागपूर-मुंबई दरम्यानचे अंतर ७०० किमी पेक्षा अधिक असल्याने सदर सेवा सुरू करण्यास तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचे खासदारांना सांगितले.