नागपूर जिल्ह्यातील दोन तरुणांचा प्रतापलोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : स्वस्त दरात घरपोच पॅनकार्ड काढून देण्याच्या नावावर नागपूर जिल्ह्यातील दोन तरुणांनी ग्रामपंचायतीशी संधान करून नागरिकांना गंडा देण्याच्या योजनेला नागरिकांच्या सतर्कतेने ब्रेक बसला. १८० रुपयांत पॅनकार्ड देण्याचा हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. काहींनी या युवकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यावरून आलेल्या संशयातून बिंग फुटले. यामुळे या दोन्ही तरुणांनी गावातून काढता पाय घेतला. रोशन मागरूडकर (२१) रा. सिर्सि (बेळा) ता. उमरेड व सूरज मुकूंद पडोळे (२२) रा. चिंचाळा ता. भिवापूर जि. नागपूर अशी या तरुणांची नावे असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. गावात येत गावकऱ्यांना फसविण्याचा प्रकार करणाऱ्या या प्रकाराबाबत कोणतीही चौकशी करण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी नगारिकांनी केला. यापूर्वीही कुटुंब विमा, आरोग्य विमा आणि आरोग्य तपासणीच्या नावार अनेक तोतया लोकांनी ग्रामपंचायतमध्ये येवून अवैधरित्या शुल्क वसुल करून ग्रामस्थांना गंडा घातल्याचे प्रकार घडले आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यास ग्रामपंचायतीने नकार दिल्याचे समजते. या तरुणांनी माझ्याकडे कोणताही संपर्क केला नाही. याबाबत मला कुठलीही कल्पना नाही. ग्रामपंचायतकडून पॅनकार्ड काढण्याबाबत दवंडी देण्यात आली नाही.- रेखा शेंद्रे , सरपंच केळझर.
पॅनकार्डच्या नावावर गंडा
By admin | Published: May 16, 2017 1:09 AM