फलक पूर्णत गंजला : करवुसली तरीही बाजार असुविधांच्या गर्तेतवर्धा : शहरातील नागरिकांना भाजी घेण्याकरिता मध्यवस्तीत सुविधा व्हावी व पालिकेला महसूल मिळावा या दुहेरी उद्देशाने वर्धेत गाळे बांधून लोकमान्य टिळक भाजीबाजार या नावाने बाजार सुरू झाला. या बाजाराला भाजीविक्रेत्यांच्या अतिक्रमणाने ग्रासल्याने ते कमी करण्याकरिता या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढून त्यांना पालिकेच्यावतीने बाजारात जागा देण्यात आली आहे. असे असले तरी या बाजाराची ओळख दाखविणारा फलक मात्र पूर्णत: गंजून आपली ओळखच विसरून बसला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील भाजी व फळबाजाराची गरज लक्षात घेत १९८५ साली शहराच्या मधोमध गोल बाजारात लोकमान्य टिळक भाजी व फळ मार्केट या नावाने बाजार तयार करण्यात आला. प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था येथे करण्यात आली. मार्केटच्या मधोमध असलेल्या विहिरीलगत लोकमान्य टिळकांना अर्थकृती पुतळाही बसविण्यात आला. परंतु हळूहळू शहर वाढले तसतसे भाजी व फळविक्रेत्यांनी बाहेर रस्त्यांवर अतिक्रमण सुरू केले. काहीच काळात मार्केटमध्ये कमी आणि बाहेरच जास्त दुकाने दिसायला लागली. त्यामुळे निर्माण झालेला अतिक्रमणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. पालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा बाहेरील भाजी व फळविक्रेत्यांना मार्केटच्या आत जागा देऊन येथेच दुकान थाटण्यास बजावले आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी सदर मार्केट आज आपली ओळखच विसरून बसले आहे.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे हरवतेय भाजीबाजाराचे नाव
By admin | Published: August 22, 2016 12:45 AM