लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १८ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता नयी तालीमच्या शांती भवनात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल.देशासाठी सर्वोत्तम शिक्षण पद्धती कशी असावी? यासंदर्भात महात्मा गांधींनी १९३७ मध्ये नयी तालीम ही योजना देशापुढे ठेवली. त्यासाठी बापूंनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून आशादेवी आर्यनायकम आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांना या शिक्षण पद्धतीकरिता वर्ध्यात आणले होते. बापूंनी जी संस्था सेवाग्रामला स्थापन केली होती त्यास ‘हिंदुस्थानी तालिमी संघ’ असे नाव दिले होते. तीच १९७२ नंतर ‘नयी तालीम समिती’ म्हणून नोंदणीकृत झाले.या संस्थेच्यावतीने आशादेवी आणि ई.डब्ल्यू.आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०१२ पासून ‘माँ-बाबा सन्मान’ दिल्या जातो. आशादेवी आणि ई.डब्ल्यू.आर्यनायकम यांना विद्यार्थी मॉ-बाबा म्हणून संबोधित होते. म्हणून या पुरस्काराचे नाव ‘माँ-बाबा सन्मान’ असे ठेवण्यात आले आहे. नयी तालीमच्या शिल्पकार असलेल्या या दोन्ही स्वयंप्रकाशित ताऱ्यांची उर्जा मिळावी व त्यांची स्मृति जोपासली जावी या उद्देशाने हा पुरस्कार दिल्या जातो. जे आजही नयी तालीम शिक्षण पद्धतीने आजचा अभ्यासक्रम शिकवितात. नव्या प्रयोगातून शिक्षणाचे विकल्प निर्माण करतात. अशा दाम्पत्याची भारतातून या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी नाशिक येथील आनंद निकेतन विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके-कालगी या दाम्पत्याची निवड करण्यात आली आहे. ३१ हजार रुपये रोख,मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नयी तालीमच्या शांती भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला हा सन्मान दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण तज्ज्ञ व माजी मुख्य सचिव तथा प्रशासकीय अकादमीचे प्राचार्य शंरदचंद्र बेहर आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेचे डॉ. के.जी. प्रसन्ना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ हे अध्यक्षस्थान भूषवतील.
नाशिकच्या विनोदिनी आणि राज पीटगे-कालगी यांना ‘माँ-बाबा पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:57 AM
येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे.
ठळक मुद्देनयी तालीम समितीचे आयोजन १८ नोव्हेंंबरला होणार सन्मान