शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

राष्ट्रीयस्तर चर्चात्मक टेराकोटा शिल्प कार्यशाळा

By admin | Published: March 12, 2017 12:37 AM

एमगिरीच्या ग्रामीण शिल्प व अभियांत्रिकी विभागाद्वारे भारतातील कुंभारकारितेला अनुसरून विविध राज्यातील

एमगिरीतील उपक्रम : प्रात्याक्षिकातून साकारणार नवीन कलाकृती वर्धा : एमगिरीच्या ग्रामीण शिल्प व अभियांत्रिकी विभागाद्वारे भारतातील कुंभारकारितेला अनुसरून विविध राज्यातील टेराकोटा प्रमुख प्रशिक्षक व सहायकांसाठी राष्ट्रीयस्तरावर चर्चात्मक टेराकोटा शिल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेला शुक्रवारी प्रारंभ झाला असून ते २४ मार्चपर्यंत एमगिरी वर्धा येथे सुरू राहणार आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी एमगिरीचे निदेशक डॉ. पी.बी. काळे, उपनिदेशक के.व्ही. राव, एमगिरीचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. काळे म्हणाले की, अनेक भारतीय पुरातन कला या लुप्त होत चालल्या आहेत. या कला वाचवायच्या असतील तर आपल्या जवळील ज्ञान हे दुसऱ्याला दिले पाहिजे. ज्ञान दिल्याने वाढते. आपण एका विशिष्ट उद्देशाने येथे जमलो आहोत. संपूर्ण भारतातील विविध राज्यातील कलाकारांच्या ज्ञानाचा फायदा एकाच ठिकाणी एमगिरीने उपलब्ध करून दिलेला आहे. या काळात चर्चात्मक सत्रातून विविध कलात्मक विषयावर चर्चेच्या व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण गोष्टी साकारल्या जातील, याचा विश्वास असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून उपनिदेशक राव यांनी ग्रामीण शिल्प व अभियांत्रिकी विभागाद्वारे ग्रामीण उद्योगाला चालना मिळावी या दृष्टीकोनातून विविध प्रशिक्षणे घेतली जातात. यात धातुशिल्प, काष्ठशिल्प, बांबू शिल्प प्रशिक्षण, खादी बॅग, कागदी बॅग प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. यातून ग्रामीण कारागिरांचे कौशल्य वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान करून आपला विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निवेदिका मयूरी पंडित यांनी केले तर आभार तुकाराम शेगोकार यांनी मानले. शिबिराला प्रशिक्षणार्थी हजर होते.(कार्यालय प्रतिनिधी)