लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : खरीप हंगामात अनियमीत पावसामुळे कापूस, सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. शासनाने जिल्हयात केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली.हेलीपॅडवर जावून निवेदन देण्यास राकॉचे माजी आमदार राजू तिमांडे यांना पोलीस प्रशासनाने मज्जाव केल्याने त्यांनी कार्यकर्त्यासह जावून आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, २०१६-१७ मध्ये सोयाबीनची बाजारातील आवक वाढुन दरात घसरण झालेली होती. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीकोनातून आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या महिन्यामध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधी मध्ये सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल २०० रुपये व जास्तीत जास्त २५ क्ंिवटल शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय सरकारने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लागू केला होता. शेतकऱ्यांनी विक्री पट्टी सातबारा उतारा, बँक खाते इत्यादी कागदपत्राची पुर्तता केली असताना सुद्धा सरकार तर्फे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकले नाही ते देण्यात यावी. कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे उत्पादन घटणार आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे व राकॉ कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने घातले मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:54 PM
खरीप हंगामात अनियमीत पावसामुळे कापूस, सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. शासनाने जिल्हयात केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली.
ठळक मुद्देकुणावार यांच्या घरी जाऊन दिले निवेदन : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा