लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्याकरिता दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा शनिवारी होऊ घातली असून जिल्ह्यातील ७ हजार ६०६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. याकरिता आठही तालुक्यामध्ये २२ परीक्षा केंद्र सज्ज झाले आहे.सर्वसामान्य परिवारातील होतकरु विद्यार्थ्यांना मोफत व निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातही सेलू (काटे) येथे नवोदय विद्यालय असून या विद्यालयात सहावीमध्ये प्रवेश देण्याकरिता दरवर्षी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विविध शाळांमध्ये पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रवेशपूर्व परीक्षेकरिता अर्ज केले आहे.शनिवारी दुपारी ११.३० ते १.३० वाजतापर्यंत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेकरिता २२ केंद्र सज्ज असून परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरिता शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.या परीक्षेकरिता प्रत्येक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेत चांगलीच मेहनत घेतली आहे. आता या परीक्षेत किती विद्यार्थ्यांची निवड होते हे निकालांतीच कळणार आहे.या परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षावर्धा तालुक्यामध्ये न्यू इंग्लिश विद्यालय, केसरीमल कन्या शाळा, भारत ज्ञान मंदिरम, अग्रगामी इंग्लिश हायस्कूल व लोक महाविद्याल हे पाच परीक्षा केंद्र आहेत.सेलूत दीपचंद विद्यालय, यशवंत विद्यालय व गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल. समुद्रपूरमध्ये संस्कार ज्ञानपीठ, विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय. हिंगणघाटमध्ये सेंट जॉन हायस्कूल, एसएसएम विद्यालय,भारत विद्यालय व महेश ज्ञानपीठ. देवळीत जनता हायस्कूल व पुलगावमध्ये आर.के.हायस्कूल. आर्वीत जिल्हा परिषद कन्या शाळा, म्युनिसिपल हायस्कूल व मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय. कारंजा येथील मॉडेल हायस्कूल व कस्तुरबा विद्यालय तसेच आष्टीमध्ये हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयात ही परीक्षा होणार आहे.
साडेसात हजार विद्यार्थी देणार नवोदयची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 6:00 AM
सर्वसामान्य परिवारातील होतकरु विद्यार्थ्यांना मोफत व निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातही सेलू (काटे) येथे नवोदय विद्यालय असून या विद्यालयात सहावीमध्ये प्रवेश देण्याकरिता दरवर्षी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विविध शाळांमध्ये पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रवेशपूर्व परीक्षेकरिता अर्ज केले आहे.
ठळक मुद्देआज प्रवेशपूर्व परीक्षा : आठही तालुक्यात २२ केंद्र सज्ज