लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य परिसरातील नवरगावचे पुनर्वसन करण्यात आले असून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याने गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नवरगाव बोर अभयारण्यांच्या बफर झोन मध्ये येत असल्याने या गावाच्या पुनर्वसनसाठी आ डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न केले होते. अखेर वनविभागाच्या जमिनीवर वर्धा - नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या बाजूला गावाचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाला नव्हता यासाठी आ पंकज भोयर यांनी ग्रामविकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला. परिणामी ग्रामविकास विभागाने १९ आॅक्टोबर रोजी अधिसूचना काढून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा बहाल केला. तसे पत्र आमदार डॉ भोयर यांनी गावकऱ्यांच्या स्वाधीन केले. याप्रसंगी नागरिकांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, जि. प. सदस्य विनोद लाखे, सेलू भाजप तालुका प्रमुख अशोक कलोडे, तहसीलदार महेंद्र सोनवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, गटविकास अधिकारी संजय पाटील, माजी सरपंच गीता कडुकर,बेबी मडावी,माजी जि. प सदस्य साहेबराव उईके, आनंदराव गजाम, सुभाष उईके,रामदास कडुकर, राधेश्याम तुमडाम, अंकुश इवनाथे व नागरिक उपस्थित होते. गावकºयांनी आनंद व्यक्त केला.
नवरगाव पुनर्वसनला मिळाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 9:58 PM
सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य परिसरातील नवरगावचे पुनर्वसन करण्यात आले असून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याने गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठळक मुद्देआमदाराच्या पाठपुराव्याला यश