शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

‘नवतपा’ची उष्णता अंगाची करणार लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:06 PM

जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरू असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सूर्यप्रहार सुरू असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाहीलाही होत आहे. शनिवार, २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार असून नवतपातील उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत असणार आहे.

ठळक मुद्दे२५ पासून रोहिणीला सुरुवात, मृग नक्षत्र ७ जूनपासून : कूलरही देईना गारवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरू असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सूर्यप्रहार सुरू असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाहीलाही होत आहे. शनिवार, २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार असून नवतपातील उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत असणार आहे.दररोज सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे. शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामीण भागात शेतशिवारात मात्र शेतकरी, शेतमजूर दुपारी १२ ते १ वाजतापर्यंत अंगातून घामाच्या धारा निघेपर्यंत काम करीत असल्याचे चित्र आहे.शहरातील नागरिक उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वातानुकूलित यंत्रांसोबतच कूलर, पंख्यांचा वापर करीत आहेत. मात्र, उष्णतेचा उकाडा त्यालाही जुमानत नाही. कूलरमध्ये पाणी भरूनसुद्धा गारवा निर्माण होत नाही, यावर्षी अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यात काही भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक उष्णतेच्या लाटेत होळपळून निघत असताना प्रत्येक जण उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून कूलर, पंखा व वातानुकूलित यंत्राचा आधार घेत आहेत.मात्र, जंगलात उन्हातान्हात गुराखी, मेंढपाळ, उंटपाळ हे हिरव्याकंच झाडाखाली शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन उष्णतेपासून बचाव करीत असल्याचे चित्र जंगल शिवारात दिसत आहे. नवतपात उष्णतेचा कहर राहणार आहे.जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वरचएकीकडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा दावा केला जात आहे, असे असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरूच आहे. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा उभारण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे वृक्षलागवड एक इव्हेंटच ठरली आहे. यामुळेच शहरासह ग्रामीण भागातील वनाच्छादित जमिनीचा टक्का लोप पावत आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक जाणवत आहेत.उन्हाळ्याचा सर्वात मोठा फटका ज्याप्रमाणे माणसांना बसला; त्यापेक्षा कितीतरी अधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसला. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटल्याने बिबट, नीलगाय, माकड मानवी वस्तीकडे वळत आहेत. काही गावांमध्ये तर मोर आणि पोपट तसेच अन्य पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. परंतु त्याची कुठे नोंद नसल्याने हा प्रश्न दुर्लक्षित राहिला. उन्हाचा फटका पिण्याच्या पाण्यालाही बसला. बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक वाढल्याने आहे ते जलसाठेही कोरडे पडले आहेत.

टॅग्स :Temperatureतापमान