लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समय सूचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची देशाला नितांत गरज आहे. नवा भारत घडविण्यासाठी देशप्रेमाने भारावलेली तरुणाई तयार होणे काळाची गरज आहे. सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे प्रशिक्षण देण्याची गरज असून हे प्रशिक्षण एन.सी.सी. मधुन मिळते. यातून सुजाण नागरिक घडतात, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.राष्ट्रीय छात्र सेनेच्या ६९ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते छात्रसैनिकांना मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रामदास तडस, उद्घाटक प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय तर प्रमुख अतिथी २१ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल पद्मभान जोशी, प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल अमिताभ सिंह, माजी सैनिक वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख मेजर हरजिंदर सिंग, मोहन अग्रवाल, इमरान राही, अमोल वनकर, मुरलीधर बेलखोडे, माजी एन.सी.सी. अधिकारी मारोतराव रेवतकर व विजय धाबे, कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात परेड संचलनाने झाली. परेडचे नेतृत्व सिनिअर अंडर आॅफीसर स्वप्नील शिंगाडे यांनी केले. प्लॅटूनचे नेतृत्व अंडर आॅफीसर धिरज कामडी, सार्जेट अपूर्वा कठाणे, कॅडेट राजेश सुरजुसे यांनी केले. बेस्ट कॅडेट कमांडर पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉम्ब हल्ल्याचे प्रात्यक्षिक आकर्षण ठरले. देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. माजी एन.सी.सी. अधिकारी मारोतराव रेवतकर व विजय धाबे यांना एन.सी.सी. मधील प्रदीर्घ सेवेकरिता स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले.कर्नल जोशी म्हणाले, युवापिढीत प्रचंड क्षमता असून त्यांच्या शक्तीचा सदुपयोग झाल्यास नवा भारत घडू शकतो. या दृष्टीकोनातून राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य प्रशसंनिय आहे. मोहन अग्रवाल यांनी भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी युवक-युवतींनी समोर येण्याचे आवाहन केले. कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेचा मुख्य उद्देश सैनिकी प्रशिक्षणातून कृतीशिल व आदर्श नागरिक घडवून त्यांच्यात शिस्त, जागरुकता, निर्भयता, राष्ट्रभक्ती व सामाजिक जाण निर्माण केली जाते.कार्यक्रमाचे संचालन सार्जेट कोमल गोमासे यांनी केले तर आभार प्रा. सुनिल राठी यांनी मानले. यशस्वीतेकरिता रवी बकाले, पूजा गिरडकर, वैभव भोयर, अमोल तडस, पवन भोयर, एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता हम सब भारतीय है या एन.सी.सी. गीताने करण्यात आली. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
एनसीसी प्रशिक्षणातून सुजाण नागरिक घडतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 9:54 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समय सूचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची देशाला नितांत गरज ...
ठळक मुद्देरामदास तडस : छात्र सेनेचा स्थापनादिन कार्यक्रम