लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात प्रतिकात्मक इव्हीएम मशीन तसेच मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष फौजिया खान यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.खान पुढे म्हणाल्या, ज्या संविधानाच्या आधारावर देशाची लोकशाही बळकट व सर्वसमावेशक आहे. त्या बदल करून सत्तारूढ सरकार समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने १७ जुलैला नागपूर येथे संविधान बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात दिल्ली येथून संविधान बचाव आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर मुंबई येथे सुध्दा हे आंदोलन करण्यात आले. विभागीयस्तरावर पहिले संविधान बचाव आंदोलन नागपूर येथे करण्यात येत आहे. शरद पवार यांच्यासह राकॉचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्ष केंद्रीत करून आहे. यापूर्वी हल्लाबोल यात्रा विदर्भातून काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याची जाणीव वैदर्भीय शेतकºयांना आहेच, असेही त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेश देशमुख, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी, जिल्हाध्यक्ष शरयु वांदीले, किशोर माथनकर उपस्थित होते.विचारधारेवर नव्हे विरोधकांवर हल्लालोकशाही प्रधान देशात प्रत्येकाला समान अधिकार आहेत. मात्र, केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारकडून त्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या जनहित विरोधी धोरण अवलंबुन विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विचारधारेचा विरोध मान्य आहे. मात्र, त्यांच्यावर हल्ले करून संपविणे हा प्रकार निंदनीयच असल्याची घनाघाती टिकाही यावेळी सरकारवर फौजिया खान यांनी केली.
राकाँ इव्हीएमसह मनुस्मृतीचे दहन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:20 PM
देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे.
ठळक मुद्देफौजिया खान :१७ ला नागपुरात संविधान बचाव आंदोलन