लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे जानेवारी २०१७ ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कौटुंबिकहिंसाचाराच्या एकूण ५७३ तक्रारी प्राप्त झाल्या. विविध कारणांनी पत्नीचा छळ करणे तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देणे शिवाय हुंड्यांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ करणे आदी कारणे या आशयाच्या तक्रारी या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी महिला तक्रार निवारण समितीने ५३४ तक्रारींचा निपटारा केला. त्यापैकी २११ प्रकरणी पती-पत्नी यांच्यात आपसी समझोता करून त्याचे संसार जोडले आहे. इतकेच नव्हे तर २६७ प्रकरणे दप्तरी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रकरणे निवारण समितीत निपटारा न झाल्याने न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. तर ५१ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ अंतभूत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच तक्रारी दाखल करून तक्रारकर्ते अथवा दोन्ही पक्षाकडील कुणीच उपस्थित न राहिल्याने व अन्य कारणांमुळे सदर महिला समितीकडे १०८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा महिला तक्रार समितीकडे येणारी प्रत्येक तक्रार जमेपर्यंत आपसी समझोत्याने निपटारा करण्यासाठी पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, सुरेखा खापर्डे, अणु राऊत, सविता मुुंडे, अंजू वाघ, व्ही.ना. क्षीरसागर आदी करीत आहेत.७ प्रकरणी गुन्हे दाखलदुरावलेल्या २११ दाम्पत्यांना एकत्र आणण्यात सदर केंद्राच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना यश आले असले तरी १०८ प्रकरणे अद्यापही विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. सात प्रकरणी चौकशीत तत्थ आढळल्याने अखेर भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुरावलेल्या २११ दाम्पत्यांना आणले जवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:52 PM
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा ...
ठळक मुद्देमहिला तक्रार निवारण कक्षाची कामगिरी : ५७३ पैकी ५३२ प्रकरणांचा केला निपटारा