लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत देश युवा वर्गाचा देश म्हणून ओळखल्या जात आहे. आज पर्यंत जगात ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली ती युवकांनीच घडवून आणली आहे. म्हणजेच युवा शक्ती विधायक किंवा विघातक वळण देवू शकते. यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास विधायक कार्य होवू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले. नेहरू युवा केंद्र व प्रहार समाज जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय युवा स्वयंसेवकांसाठी कार्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बुधवारी बोलत होते.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे माजी जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, तालुका क्रीडा अधिकारी पुरूषोतम दारव्हणकर, प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवधन शर्मा लेखापाल दयाराम रामटेके, रविंद्र काकडे उपस्थित होते.युवा स्वयंसेवकांसाठी कार्य शिबिरात जिल्ह्यातील निवडक ६० युवक युवती सहभागी झाले होते. शिबिराच्या यशस्वीतेकरिता सहा युवा संघ तयार करण्यात आली होती व त्यांना समाज सेवकांची नावे देण्यात आली होती. ज्यात तुषार झाडे यांनी बाबा आमटे युवा मंडळाचे, शैलेश आगलावे यांनी सुंदरलाल बहुगुणा युवा मंडळ, गायत्री निरगुडे, पोपटराव पवार युवा मंडळ, रंजित कापसे यांनी बाबा आमटे युवा मंडळ, ओम प्रकाश बधरिया यांनी मेधा पाटकर युवा मंडळ, नितेश महाकाळकर यांनी देवाजी तोफा युवा मंडळ तर शुभांगी ढाले यांनी अण्णा हजारे युवा मंडळाचे नेतृत्व केले.शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी अॅडव्हेंचर हिल्सवरील पावसाचे पाणी अडविण्याकरिता २०० मिटर खंदक खोदला. याशिवाय परिसरातील गाजर गवत निर्मूलन, पाणी अडवा पाणी जिरवा या विषयावर पथनाट्य, पाणी बचतीबाबत परिसरातील घरोघरी जावून जनजागृती वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी प्रहार संस्थेचे २१ प्रकारचे अडथळा पार प्रशिक्षण, रॉक क्लाईबिंग, रॅपेलिंग, प्रश्न मंजुषा, गटचर्चा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा व विविध साहसी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.बौध्दिक सत्रात वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रा.सी.बी. देशमुख, जिल्हा स्काऊटर दत्तराज भिष्णुरकर, गाईड संघटक वैशाली अवथळे, संतोष तुरक व रविंद्र गुजरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवधन शर्मा यांनी केले. याप्रसंगी कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर व संजय माटे यांनी विचार प्रकट केले. संकेत हिवंज व जयश्री भोयर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन जयश्री भोयर तर आभार रंजीत कापसे यांनी मानले.
युवा चळवळ सक्रिय करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:12 AM
भारत देश युवा वर्गाचा देश म्हणून ओळखल्या जात आहे. आज पर्यंत जगात ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली ती युवकांनीच घडवून आणली आहे. म्हणजेच युवा शक्ती विधायक किंवा विघातक वळण देवू शकते. यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास विधायक कार्य होवू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.
ठळक मुद्देविवेक भिमनवार : युवा स्वयंसेवकांच्या कार्य शिबिराचा समारोप