लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून गत दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. त्यासाठी जिल्ह्यातही ठिकठिकाणी १ ते ३१ जुलैदरम्यान वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्हा कुठेही कमी पडता कामा नये. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष संगोपन गरजेचेच आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. सदर बैठकीला आ. डॉ. पंकज भोयर, उपवन संरक्षक सुनील शर्मा, संजय इंगळे तिगांवकर, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, वृक्ष मित्र मुरलीधर बेलखोडे आदींची उपस्थिती होती. आ. डॉ. भोयर यांनी वृक्ष लागवडी संदर्भात वनविभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली. यावर्षी जिल्ह्यात २७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याची माहिती उपवन संरक्षक सुनील शर्मा यांनी दिली. शासनाचे विविध विभाग, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. घरगुती वृक्ष लागवडीसाठी १२७८७ सामाजिक संस्था, १,२२०८०, बांधकाम विभाग व ३८,११०, केंद्र शासनाचे कार्यालय १७,२३०, उद्योग ५०,०००, एफडी विभाग ७,९५,०००, एसएफडी ५ लक्ष, कृषी विभाग ३,१२६२५, शहरी विकास विभाग २०,६७५, गृहविभाग ४१,०९०, उद्योग विभाग ५,१७०, न्यायालय ४८२५, आदिवासी विभाग ५,७९५, उर्जा विभाग ५४२५, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ४४८०, पाणी पुरवठा विभाग १,०७,५३५, ग्रामपंचायत ५,६७३२० व अन्य विभागाने याप्रमाणे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाने नागरिकांच्या घरा शेजारी रोपटे उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगितले.प्रत्येक विभागाकडून खड्डे खोदण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरूजिल्ह्याला देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीबाबतच्या उद्दीष्टाच्या पूर्ती करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व विविध शासकीय कार्यालयाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. वृक्षारोपणासाठी ठिकठिकाणी खड्डेही खोदण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य घेत वरिष्ठांनी दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त रोपटे ठिकठिकाणी लावण्यासाठीच सध्या प्रयत्न होत असल्याचेही बैठकीदरम्यान सांगण्यात आले. आतापर्यंत वृक्षलागवडीसाठी दिलेल्या उद्दीष्टापैकी ८० टक्के खड्डे खोदण्याचे काम झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.आमदारांच्या हस्ते ‘रोपटे आपल्या दारी’चा श्रीगणेशावर्धा - स्थानिक आर्वी नाका परिसरात आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते वन विभागाच्या ‘रोपटे आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या परिसरात एक वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, सामाजिक वनिकरणचे डी. एन. जोशी, सहाय्यक वनसंरक्षक काळे, सुहास बढेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, एस. डी. भेंडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एस. डी. भेंडे यांनी केले. यशस्वीतेकरिता वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी विशेष सहकार्य केले.
पर्यावरणासाठी वृक्ष संगोपन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:41 PM
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून गत दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे.
ठळक मुद्देपंकज भोयर : वृक्ष लागवड विषयी आढावा बैठक; घराशेजारीच उपलब्ध करून दिलेय रोपटे