लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ३० नोव्हेंबरपासून आर्वी परिसरात मोफत पशुचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक केंद्रीय जलसंधारण मंत्री यांचे विशेष सल्लागार सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाने पदव्युत्तर विभागाचे सुमारे २० डॉक्टर, पदवी प्रशिक्षण येणाºया अंतिम वर्षाचे सुमारे ५० डॉक्टर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सर्व डॉक्टर असे सुमारे १०० डॉक्टर तपासणी करतील.यासंदर्भात माहिती देतांना सुधीर दिवे पुढे म्हणाले की, सात दिवस विविध ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत. मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, लसीकरण व उपचारासोबतच तज्ज्ञ पशुचिकित्सक शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत. जाजूवाडी आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन पशुवैद्यक व मत्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांच्या हस्ते होईल. तसेच ३० नोव्हेंबरला आर्वी येथे गायी, म्हशी व इतर पशुधनासोबतच पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा यावरही शस्त्रक्रीयेसह इतरही उपचार करण्यात येतील. १ डिसेंबरला साहूर, २ डिसेंबर विरुळ, ३ ला खरांगणा, ४ ला कन्नमवारग्राम, ५ ला नारा, ६ डिसेंबर रोजी रोहणा या ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये सकाळी ७.३० वाजता शिबिरांना प्रारंभ होईल. समारोप ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे होणार आहे. समारोप कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभाग पुणेचे आयुक्त डॉ. उमाकांत उमप उपस्थित राहणार आहे.आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर दिवे यांनी पत्रपरिषदेत केले. पशुपालकांनी नाव नोंदणीसाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्वी, आष्टी, कारंजा आणि तळेगाव येथील कार्यालयात संपर्क साधावा. पत्रपरिषदेला नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बन्नाळीकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. सुनील सहातपुरे, डॉ. वसुनाथे उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी निरोगी पशुधन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:47 AM
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देसुधीर दिवे : आर्वी विधानसभा क्षेत्रात पशु तपासणी शिबीर