शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नागरिकांची स्वतंत्र राजकीय शक्ती उभारण्याची गरज - तुषार गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 8:00 PM

सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानची दोन दिवसीय बैठक

वर्धा : भाजप आणि आरएसएसचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणे, हे आमचे अंतिम ध्येय असू शकत नाही. हे शॉर्ट टर्म काम आहे. आमचे अंतिम ध्येय समाजात सुधारणा करणे असावे. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होण्याची गरज नाही, तर नागरिकांची स्वतंत्र राजकीय शक्ती उभारण्याचे काम करावे लागेल, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.

सेवाग्राम येथे आयोजित भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही काही काळाकरिता लोकांना वाचवले. राजकीय पक्षांमध्ये शिथिलता आली आहे. मात्र, आम्हाला कायम सक्रिय राहावे लागेल. त्यासाठी दुहेरी रणनीती बनवावी लागेल. द्वेषाला लोकांच्या मनातून आणि मेंदूतून काढावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विजय महाजन यांनी अभियानाची स्थापना, अखिल भारतीय विस्तार, कामाचे स्वरूप व निवडणुकीतील कामगिरी यावर भाष्य केले. प्रा. आनंद कुमार यांनी नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय आणि अनेक मार्गांनी होत असलेल्या दडपशाहीला पुरून उरल्याबद्दल कौतुक केले.

ज्येष्ठ अभ्यासक कुमार प्रशांत यांनी दीर्घकालीन कामाची गरज स्पष्ट करताना ‘भारत जोडो अभियाना’ने आपली पुढील भूमिका स्वतःशी स्पष्ट करण्याचे आवाहन केले. लोककेंद्री राजकारणाला अग्रक्रमाने मजबूत करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. ललित बाबर यांनी अध्यक्षीय भाषणात अभियानाच्या महाराष्ट्रातील कामाचा, रणनीतीचा आढावा घेतला. संविधानाला मानणाऱ्या पक्ष व संघटनांनी दाखवलेल्या एकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रस्तावदुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला अभियानाचे निमंत्रक योगेंद्र यादव यांनी राजकीय ठराव मांडला. संविधानाच्या उद्देशिकेतील समानता व न्यायाच्या मूल्यांवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी परिघावरील समुदाय, तळागाळातील वंचित समूह यांची मोट बांधण्याची गरज असल्याचे ठरावात नमूद केले. समन्वय समितीच्या सदस्य उल्का महाजन यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांनी ठरावातील मुद्द्यांवर मत मांडून सूचना केल्या. देशभरातून २५० च्यावर प्रमुख कार्यकर्त्यांचा अधिवेशनात सहभाग आहे. अधिवेशनात संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला.

अधिवेशनाला मान्यवरांची उपस्थितीभारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनात राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव, विजय महाजन, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, लोकतांत्रिक राष्ट्र निर्माणचे मार्गदर्शक प्रो. आनंद कुमार, राष्ट्रीय सचिव कविता कुरुघंटी, महाराष्ट्र संयोजक उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगो, स्वाती मासगांवकर, अविक शहा, गांधी विचारक कुमार प्रशांत, सेवाग्राम आश्रमचे सचिव विजय तांबे, संविधान कार्यकर्ते राजू भिसे, फिरोज मिठीबोरवाला, माजी आमदार पंकज पुष्कर, आनंद माजगांवकर आदींसह देशभरातील सामाजिक व परिवर्तनवादी चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते सहभागी आहे.

संकट संपले नसून कमजोर झाले - योगेंद्र यादवअधिवेश्नाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी आवश्यक प्रस्तावाचे वाचन व वर्तमान स्थितीत ‘भारत जोडो’ अभियानाची भूमिका विषद केली. त्यांनी देशावरील संकट सध्या संपले नसून ते कमजोर जरूर झाले, असे सांगितले. आपली लढाई कठीण आहे, असे सांगताना यादव म्हणाले, लोकसभेत भाजपजवळ बहुमत नाही, तर एडीएजवळ बहुमत आहे. इंडिया अलायंसकडे बहुमत नाही, पण त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विरोधकांचा आवाज वाढला आहे. भारत जोडो अभियानाचा उद्देश लोकतंत्र आणि संविधान वाचविणे, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक सलोख्याकरिता काम आवश्यकतुषार गांधी यांनी भारत जोडो अभियानाने विविध संघटना व कार्यकर्त्यांची मोट ज्या समर्थपणे बांधली, त्याचे कौतुक केले. आता नागरी संघटनांनी तटस्थ राजकीय भूमिका न घेता पुढील पाच वर्षांतील राजकीय हस्तक्षेपाचे नियोजन करावे, असे मत त्यांनी मांडले. तसेच सामाजिक सलोख्याकरिता यापुढे काम करण्याची गरज अधोरेखित केली. निवडणुकीत बहुमत कमी झाले असले तरी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत काहीही बदल झाला नाही. त्याकरिता सामाजिक व राजकीय काम एकत्र करणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम