चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या जेवढी आहे तेवढे देखील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषदेला मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींपैकी ३०१ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामसेवक आपले कर्तव्य पार पाडत आहेत. काही ग्रामसेवकांवर एकाहून अधिक भार असल्याने मनुष्यबळाअभावी कामांचा ताण त्यांच्यावर येतो आहे. अशातच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारे पुरेसे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकच नसल्याने योजना पोहचविण्यात अडचण निर्माण होत आहे.
सध्या विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना थेट निधी जमा होत असल्यामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक ३९ नसलेल्या गावांमध्ये विकासकामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पंचायत राज व्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ३७ ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. शिवाय राजकारणातील सुरुवातीचे धडे सुद्धा ग्रामपंचायतींमध्ये गिरवले जातात. या ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून शासन पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या काळात केंद्र शासनाकडून देण्यात येणारा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नेत्यांकडे मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहेत.
गावाची गरज पाहून विकासकामे करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग दिला जात नाही. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहतात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळू शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे याचा परिणाम गावातील कामांवर होत आहे. काही ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने ते कोणालाच न्याय देऊ शकत नाहीत. परिणामी, ग्रामसेवकांविरुद्ध तक्रारी सुरू होतात.
तक्रार आली की अधिकारी देखील कसलाही विचार न करता प्रथमा त्यांच्यावर कार्यवाही करतात. त्यामुळे त्यांचीही काम करण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत तेथे पूर्णवेळ ग्रामसेवक केव्हा मिळणार असा सवाल करण्यात येत आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांची स्थिती
- मंजूर पदे - ५८
- कार्यरत पद - ४७
- रिक्त पदे - ११
जिल्ह्यातील ग्रामसेवकांची स्थिती
- मंजूर पदे - ३२२
- कार्यरत पद - २५८
- रिक्त पदे - ६४
जिल्ह्यात कार्यरत ग्रामसेवक अन् ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकजिल्हा ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी जिल्ह्यातील रिक्त ग्रामसेवकांची पदेवर्धा ३५ १५ १०सेलू ३१ ०४ ०६देवळी ३४ ०२ १०आर्वी ३९ ०९ ०९आष्टी २० ०२ ०७कारंजा २७ ०३ ०६हिंगणघाट ३७ ०८ ०८समुद्रपूर ३५ ०४ ०८
एक ग्रामपंचायत, एक ग्रामसेवक धोरण हवेजिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायती असून केवळ ३२२ ग्रामसेवक आणि ५८ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २५८ ग्रामसेवक आणि ४७ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. परिणामी, एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. एका ग्रामपंचा- यतीत अनेक गावे येत असल्याने एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक धोरण राबविण्याची गरज आहे.