लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन के्रडीट को-आॅपरेटिव्ह सोसायटी, या बँकेच्या नावावर ठेवीदारांना आमीष दाखवत प्रादेशिक व विभागीय व्यवस्थापक (जावई-मेहुणा) यांनी पावणे दोन कोटींचा गंडा घातला. यातून त्यांनी मित्र परिवारालाही सोडले नाही. ठेवीतील ४० टक्के रक्कमेची या जावई-मेहुण्यांची अफरातफर करुन ठेवीदारांच्या पैशावर ऐशोआरामाचे जीवन जगत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांकडून होत आहे.ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन के्रडीट को-आॅपरेटिव्ह सोसायटी, लासलगांव, जि. नाशिक या बँकेच्या नावावर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीराम उर्फ नितीन धनराज काळे, आशिष काळे व अक्षय भुगूल यांनी जास्त व्याजाचे आमीष दाखवित ठेवीदारांकडून मोठी रक्कम स्वीकारली. ठेवीचा कोणताही करार नाही, पावत्या नाही तसेच त्यावर कर्ज मिळण्याची हमी नाही, याबाबत या ठगबाजांनी पुरेपुर काळजी घेतली. त्यांनी वर्धा, आर्वी, आष्टी, हिंगणघाट येथील ४ बँकेत कर्मचारी लावताना प्रत्येकी १ लाख रुपये ठेवी व २५ हजार रुपये अशी वसुली केली. जवळपास २२ कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केल्याची माहिती तक्रारीतून पुढे आली आहे.मास्टरमार्इंड श्रीरामने भाऊ व मेहुण्याचा आधार घेत चांगलीच माया जमविली.आता ठेवीदार पैसे मागायला काळे यांच्या घरी जात आहे. तेव्हा घरी येऊ नका; अध्यक्ष तुरुंगात असून प्रशासक नेमले आहे. तुम्ही घरी येऊन मनस्ताप दिला तर पोलिसात तक्रार करील, अशी धमकी दिली जात असल्याचे ठेवीदारांकडून सांगण्यात आले. मोठ्या मेहनतीने कमाविलेला हातचा पैसा अचानक निघून गेल्याने काळे बंधूच्या कर्माची कुंडली वाचताना आता ठेविदार ढसाढसा रडत आपले गाºहाणे मांडत आहे.जावई-मेहुण्यांच्या त्रिकुटांनी असा रचला खेळयापूर्वी अनेकांना गंडा घालणाºया तळेगावातील श्रीराम उर्फ नितीन काळे याने बँकेचे संस्थापक अध्यक्ष सतीश काळे, रा. लासलगाव यांना विश्वासात घेऊन प्रादेशिक व्यवस्थापकपदी स्वत:ची नियुक्ती करुन घेतली. त्यानंतर मेहूणा अक्षय भुगूल याला यवतमाळ येथून बोलावून विभागीय व्यवस्थापक बनविले. केवळ बारावीपर्यंतच्याच शिक्षणाच्या भरोवशावर अक्षयला विभागीय व्यवस्थापक बनविल्याची कुठलीही माहिती श्रीरामने संस्थापक अध्यक्षाला दिली नसल्याचे तायडे यांनी सांगितले.इतक्यावरच न थांबता त्याने पंचायत समितीत १५ हजार रुपये महिन्यांनी कार्यरत असलेल्या आशिष काळे या सख्ख्या भावाला आर्वी शाखेत व्यवस्थापक केले. त्याच्या नावे महिन्याला २० हजार रुपये वेतन काढले. श्रीराम व आशिष या दोन्ही भावांसह मेहूणा अक्षय या त्रिकुटांनी ठेवीतील ४० टक्के रक्कम हडप करुन आपला व्यवसाय वाढविला. दोन नवीन कार विकत घेतल्या तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी जमा केली. सोने व प्लाटही खरेदी करुन जवळपास ७० लाखांची गुंतवणूक केल्याची माहिती व्यवस्थापक तायडे यांनी दिली.वर्गमित्राला व्यवस्थापक बनवून फसविले.श्रीराम काळे यांने वर्गमित्र प्रशांत तायडे याला आष्टी शाखेचा व्यवस्थापक बनविले. त्याला ५० हजार तर त्याची आई रत्नमाला तायडे यांना २ लाख व वडील प्रभाकर तायडे यांना २ लाख रुपयांनी गंडविले. यासोबतच ज्यांच्या घरी बँकेकरिता रुर किरायाने घेतली होती, त्या मेघश्याम धोंगडी यांना ४ लाख ५० हजार रुपये तर आष्टी येथील शेषराव बानाईत ५ लाख ५० हजार, निलेश मोकद्दम ५ लाख, निरंजन हिरुडकर १ लाख ८५ हजार, रितेश कोहळे १ लाख, सुधीर सुपारे १६ लाख, राजकिशोर कोत्तावार ६ लाख, हर्षा मानकर ३ लाख रुपये यांसह २८५ ठेविदारांचे एकूण १ कोटी ८५ लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत नमुद आहे. बनाईत यांनीही पोलिसात तक्रार केली आहे.वर्ध्यासह यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातही घातला गंडाजिल्ह्यातील चार ठिकाणी गंडा घातल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीराम काळे यांने आपला मोर्चा यवतमाळ व अमरावती जिल्ह्याकडे वळविला. यवतमाळात प्रशासन वेगळे असल्याने राळेगाव येथे शाखा उघडली. तेथे ६ कर्मचाºयांची नियुक्ती करुन प्रत्येकांकडून दीड लाखांची एफडी व ५० हजार रुपये डोनेशन घेतले. तिवसा येथील शाखा वर्धा जिल्ह्याशी जोडून ६ कर्मचाºयांची नियुक्ती करीत तेथेही हाच उपक्रम राबविला. यासर्वांकडून गोळा केलेली रक्कम स्वत:च्या व पत्नीच्या खात्यात जमा केली. विशेष म्हणजे एका बँकेकरिता १५ लाख रुपये इंफ्रास्ट्रक्चरवर खर्च केल्याचे दाखविले. यात संगणक, फर्निचर व स्टेशनरीचे अव्वाच्यासव्वा बील जोडण्यात आले. काळे यांच्या घरी एमएससीआयटीचे केंद्र असून आशिष हा ते केंद्र चालवितो. या बँकेतील संगणक त्याच केंद्रात नेऊन आपला व्यवसाय मोठा करण्यात काळे बंधूनी बाजी मारल्याचा आरोप होत आहे.
ठेवीदारांच्या ‘माया’वर व्यवस्थापकांचा ‘जाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:57 PM
ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन के्रडीट को-आॅपरेटिव्ह सोसायटी, या बँकेच्या नावावर ठेवीदारांना आमीष दाखवत प्रादेशिक व विभागीय व्यवस्थापक (जावई-मेहुणा) यांनी पावणे दोन कोटींचा गंडा घातला. यातून त्यांनी मित्र परिवारालाही सोडले नाही.
ठळक मुद्देदोन कोटींचा गंडा : मित्र परिवारालाही लावला चुना, तळेगावात पैसे मागणाऱ्याला दिली जाते धमकी