लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप गवसले नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी सकाळी ७ वाजता ‘निर्भय वॉर्निंग वॉक’ करण्यात आला. ‘आम्ही तुमच्या गोळीला घाबरत नाही, विवेकाचा आवाज बुलंद करत राहू’ असा संदेश देत हा वॉक करण्यात आला.डॉ. दाभोळकर व पानसरे हे मॉर्निंग वॉका गेले असता माथेफिरूंनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दाभोळकर यांच्या हत्येला ५० महिने तर पानपसरे यांच्या हत्येला ३२ महिने झाले. कर्नाटकातील विचारवंत प्रा. एम.एन. कुलबूर्गी व नुकतीच पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या सर्वांचे मारेकरी व सुत्रधार अद्याप मोकाट आहे. याचा निषेध नोंदवित डॉ. दाभोळकर, पानसरे व प्रा. कलबुर्गी यांचे चित्र असलेले अॅप्रॉन घालून फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर या घोषणा देत शिवाजी पुतळ्यापासून मॉर्निंग वॉकला सुरूवात झाली. म. गांधी चौक ते डॉ. आंबेडकर चौक मार्गाने परत शिवाजी पुतळ्याजवळ वॉकची सांगता झाली. यात गजेंद्र सुरकार, बाबाराव किटे, डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, सुनील ढाले, गौतम पाटील, हेमंत शेंडे, तनिष्क शेंडे आदी सहभागी झाले होते.
निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:00 PM
महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप गवसले नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी सकाळी ७ वाजता ‘निर्भय वॉर्निंग वॉक’ करण्यात आला.
ठळक मुद्देमहाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप गवसले नाही.