लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिमेंटीकरणाच्या काळात विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्ग भकास केल्या जात आहे. परिणामी निसर्गचक्रही बदलल्याने त्याचे परिणाम सजिव सृष्टीला भोगावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे ऋृतुनेही कालमान बदलले आहे. त्यासाठी आता निसर्गाला वाचविण्यासाठी आणि माणुसकीला नवी पालवी फोडण्यासाठी सर्वांनी अधिकाअधिक वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे पुढच्या पिढीला सुंदरतेने नटलेली सृष्टी बघता येईल.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात सेलू तालुक्यातील जंगलापूर येथून होत आहे. झाड या ग्रहावरील सर्वात जूना जीव म्हणून ते आपल्याला आॅक्सिजन देतात, कार्बन संग्रह करतात. माती स्थिर करतात आणि जगातल्या सर्व जीवांना जीवन देतात. ते आपल्याला सर्व साधने आणि निवारासाठी सामग्री देखील प्रदान करतात. जीवनासाठी फक्त झाडे नाहीत, तर पृथ्वीवरील सर्वात दीर्घ जीवित प्रजाती म्हणून ते आपल्याला भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यामधील दुवा ठरते. वृक्ष भौतिक शोषक म्हणून कार्य करतात. धूळ पकडतात आणि हवेतून प्रदूषण शोषून घेतात. सौर किरणांपासून छाया प्रदान करतात आणि ध्वनी कमी करतात. झाडे आणि हिरव्या स्थानापासून दूर राहिल्याच्या काही मिनिटांमध्ये रक्तदाब कमी होतो. आपल्या हृदयाची गती कमी होते आणि आपला ताण कमी होते, असे संशोधनाने सिद्ध केल्याने वृक्ष हे आरोग्यदायी सुद्धा आहे. तसेच झाडे अनेक सुक्ष्म जीवांचा अधिवास म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे वृक्षाचे रोपटे लावून चालणार नाही तर त्याच्या संगोपणाची जबाबदारीही प्रत्येकाला स्वीकारावी लागणार आहे.वृक्ष : अनेक मुल्यांचा आधारपर्यावरणीय मूल्य : आॅक्सिजन देऊन हवेची गुणवत्ता सुधारतात. जमिनीचे संरक्षण करतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेदरम्यान झाडे कार्बन डायआॅक्साईड घेतात आणि आॅक्सिजन सोडतात. कृषी विभागानुसार, १ एकर जंगलात ६ टन कार्बन डायआॅक्साईड शोषून घेते आणि ४ टन आॅक्सिजन बाहेर टाकते जे १८ लोकांची आॅक्सिजनची वार्षिक गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.सामाजिक मूल्य : झाडे प्रत्येक समुदायाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. झाडे शहरी वस्त्यांमध्ये नैसर्गिक घटक आणि वन्यजीव वस्तीत आणून आपल्या आयुष्यातील गुणवत्ता वाढवतात. सूर्यावरील प्रकाश टाळण्यासाठी शहरांमध्ये वृक्षांची लागवड केल्यास ताप व व्यावसायिक इमारतीमुळे निर्माण होणाऱ्या उष्णता लहरींचा प्रभाव कमी होतो.वैयक्तिक व आध्यात्मिक मूल्य : झाड हे मनमोहक, सुंदर व भव्य आहेत. वेगवेगळ्या प्रजाती, आकार, स्वरूप, सुगंध, पोत आणि तेजस्वी रंगांची असंख्य निरंतर विविधता प्रदर्शित करतात. ऋतुबदलाप्रमाणे प्रत्येक झाड वेगळे दिसतात.व्यावहारिक व व्यावसायिक मूल्य : वृक्षांनी आपल्याला स्वत:चे आयुष्य समर्थित केलेले असते. स्वयंपाकासाठी सरपणाचाच वापर होतो. बांधकाम, क्रीडा उपकरण व अनेक घरगुती वस्तू तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो. तसेच सर्व झाडे ही रसायने आणि औषधे याचा स्रोत आहेत.
वृक्षारोपणातून निसर्गासह माणुसकीला फुटणार नवी पालवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 9:22 PM
सिमेंटीकरणाच्या काळात विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्ग भकास केल्या जात आहे. परिणामी निसर्गचक्रही बदलल्याने त्याचे परिणाम सजिव सृष्टीला भोगावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे ऋृतुनेही कालमान बदलले आहे. त्यासाठी आता निसर्गाला वाचविण्यासाठी आणि माणुसकीला नवी पालवी फोडण्यासाठी सर्वांनी अधिकाअधिक वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे पुढच्या पिढीला सुंदरतेने नटलेली सृष्टी बघता येईल.
ठळक मुद्देआजपासून वनमहोत्सव : १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम