शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सत्यशोधकी साहित्यातच देणार नवे आत्मभान

By admin | Published: February 13, 2017 12:36 AM

महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा स्वीकारण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनवादी विचार स्वीकारुन पुढे गेले पाहिजे

भारत पाटणकर : परिसंवादात समीक्षकांनी घेतला विविध पैलूंचा वेध वर्धा : महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा स्वीकारण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनवादी विचार स्वीकारुन पुढे गेले पाहिजे. कारण सत्यशोधकी साहित्यच नवे आत्मभान देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. व्यंकटराव गोडे साहित्य नगरीत आयोजित दहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी साहित्य प्रवाहांचा मूलस्त्रोत या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संशोधक डॉ. श्रीराम गुंदेकर तर वक्ते म्हणून डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ. शंकर बोऱ्हाडे उपस्थित होते. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, प्रस्थापित मराठी साहित्य व सत्यशोधकी साहित्याचे मुलादर्श पूर्णत: वेगळे आहेत. भारतीय संविधानाला अभिप्रेत मूल्यांच्या आधारावर सत्यशोधक साहित्यातून शोषित व वंचितांचे प्रश्न मांडले जातात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या संयुक्त विचारातूनच सत्यशोधक साहित्य समृद्ध होणार आहे. त्यामुळे या साहित्याला बंदिस्त करू नका, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. श्रीराम गुंदेकर म्हणाले, नव्या लेखकांनी केवळ ललित लेखन न करता वैचारिक व संशोधनपर लेखन केले पाहिजे. सत्यशोधकी साहित्याने केवळ कलावादी मूल्यांशी बांधील असून जीवनवादी आशय हाच मुख्य गाभा आहे. त्यामुळे सभोवतीचे जगणे समजावून विवेकाच्या आधारावर लेखन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. कारण हे साहित्य सर्व परिवर्तनवादी प्रवाहांचा मुलस्त्रोत ठरला आहे. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी परिवर्तनवादी साहित्याचे वैशिष्टय अधोरेखित केले. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सत्यशोधक चळवळ व साहित्य यावर विवेचन केले. संचालन डॉ. सुधाकर सोनोने यांनी केले. आभार संजय गावंडे यांनी मानले. सायंकाळी सुषमा वासेकर यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री नाटयप्रयोग सादर केला. आयोजनासाठी राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, गुणवंत डकरे, डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. महाजन, प्राचार्य जनार्दन देवतळेंसह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी) सत्यशोधकी स्त्रीवादावर चिंतन रविवारी सकाळी ११ वाजता सुनीता काळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधकी स्त्रीवाद : भूमिका आणि वास्तव या विषयावर परिसंवाद झाला. प्रा. भगवान फाळके यांनी बीजभाषण केले. पुण्याच्या प्रा. प्रतिमा परदेशी व चंद्रपूर येथील कार्यकर्त्या शाहिदा शेख यांनी सत्यशोधकी स्त्रीवादाची मूलगामी मांडणी केली. संचालन डॉ. विद्या कळसाईत यांनी केले. संभाजी भगतांची लोकशाहीरी मुंबईचे प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता मसत्यशोधकी माध्यमे व तरुणांचा सहभाग हा परिसंवाद झाला. अभ्यासक श्रीकांत बारहाते व राजेश मडावी यांनी विषयाची मूलभूत मांडणी केली. उमरखेडचे प्रेम हनवंते यांनी बीजभाषण केले. श्रोत्यांच्या आग्रहास्तव लोकशाहीर संभाजी भगत यांनी मचोर लुटेरे बैठे रे भाई ही शाहिरी सादर केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. संचालन प्रा. एकनाथ मुरकुटे यांनी केले तर आभार प्रदीप ताटेवार यांनी मानले. काव्य संमेलन रंगले प्रसिद्ध कवी डॉ. सुधाकर डेहनकर यांच्या अध्यक्षतेखाली रात्री आठ वाजता काव्यसंमेलन पार पडले. मानवी जगण्याचे ताणबाणे उलगडून दाखविणाऱ्या विविध जीवनवादी कवितांनी हे सम्मेलन चांगलेच रंगले. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांपासून तर जीवनाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या कविता सादर झाल्याने रसिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काव्यसंमेलनात राज्यातील ६० कवी सहभागी झाले होते. संचालन प्रल्हाद पोळकर, माधुरी शोभा यांनी केले.