लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वेची वाढलेली वाहतूक लक्षात घेता भारत सरकारने २०१६ मध्ये वर्धा ते बल्लारशाह या तिसºया नवीन रेल्वेलाईनच्या कार्याला मंजुरी प्रदान केली. आज वर्धा-चितोडा-सोनेगाव या १३ किलोमीटर लांबीच्या कार्याचा लोकार्पण पार पडल्याने या मार्गावरील वाहतुकीवरचा ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मालगाडीला हिरवी झेंडी दाखवून नवीन रेल्वेलाईनवर मालगाडीला रवाना केले. प्रवासी व उद्योजक मोठ्या प्रमाणावर नवीन रेल्वे प्रारंभ करण्याकरिता विनंती करतात. रेल्वेचा प्रवास अत्यंत कमी खर्चाचा, आरामदायी व सुरक्षित असल्याने प्रवाशांचा रेल्वेवर विश्वास आहे. वर्धा ते बल्लारशाह नवीन रेल्वेलाईनमुळे भविष्यात रेल्वे सुविधांचा विस्तार करणे सहज शक्य होईल. येणाऱ्या काळात वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्व रेल्वेस्थानक वायफाय सुविधेने जोडले जातील व आजच्या डिजिटल इंडिया युगामध्ये प्रवासीवर्गाला या सुविधेचा लाभ मिळेल, असेही खा. तडस म्हणाले. याच कार्यक्रमादरम्यान सेवाग्राम रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधाही सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, मदनसिंग चावरे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक पाटील, प्रणव जोशी, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता कावरे, वाणिज्य निरीक्षक अजय पुनवटकर आदी उपस्थित होते.
नवीन रेल्वेलाईनमुळे वाहतुकीचा भार हलका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM
वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मालगाडीला हिरवी झेंडी दाखवून नवीन रेल्वेलाईनवर मालगाडीला रवाना केले.
ठळक मुद्देरामदास तडस : वर्धा ते सोनेगावपर्यंतच्या तिसऱ्या लाईनचे लोकार्पण