३५ युवा शेतकरी पुण्याला रवाना : शेतीविषयक नवनवीन तंत्र शिकणारवर्धा : आष्टी तालुक्यातील ३५ युवा शेतकरी शेडनेट पाली हाऊस प्रशिक्षण व स्मार्ट शेतीचे नवे व्हिजन आत्मसात करण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहेत.याप्रसंगी राहुल ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. विद्यमान स्थितीत उदरनिर्वाहाशिवाय भविष्य घडविण्याचा कुठलाच पर्याय शेतीच्या भरवश्यावर उरला नाही. शेतकऱ्यांची मुलांकडे सुशिक्षित बेरोजगार म्हणून बघितले जाते. आष्टी तालुक्यामध्ये ६० टक्केपेक्षा जास्त बागायती शेती आहे. ओलिताची सोय आहे, असे सर्वेक्षणाचे आकडे दर्शवितात. परंतु त्या मानाने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले, असे दिसत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पारंपरिक पीक पध्दती व नवनवीन व्यवसायाबद्दल मार्गदर्शनाचा अभाव हे आहे. याकरिता प्रशिक्षण व अभ्यासदौऱ्यातून युवा शेतकऱ्यांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करून देण्याचा उपक्रम राहुल ठाकरे यांनी हाती घेतला आहे. याचाचा एक भाग म्हणून गणेश चतुर्थीचे औचित्य ३५ युवा शेतकऱ्यांना शेडनेड पॉली हाऊस प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पोस्ट हार्वेस्ट हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव (दाभाडे) पुणे येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, सदर युवा शेतकऱ्यांना टमाटर शेती, फुलशेती, भाजीपाला लागवड, फळबाग शेती इत्यादी पिकांबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शेळीपालन, दुग्धव्यवसाय, सेंद्रीय शेती यासारखे प्रशिक्षणही युवा शेतकऱ्यांना देण्याचा मानस राहुल ठाकरे यांनी व्यक्त केला.(जिल्हा प्रतिनिधी)
युवा शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेतीचे नवे व्हिजन
By admin | Published: September 09, 2016 2:19 AM