लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : निधा टाकळी, सिरसगावसह कान्होली, कात्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक धोकादायक वळणावर आहे.रस्त्यावरील डांबर नामशेष झाले असून, खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. पुलांच्या संरक्षण भिंती तुटून पडल्या असून रस्त्यावर भगदाड पडले आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांना अपघात कित्येक निष्पापांना जीव गमवावा लागला. निधा टाकळी येथे सातव्या वर्गापर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सिरसगाव, वडनेर येथे जावे लागते. मात्र, दुर्दशित रस्त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ आली आहे,निधा टाकळी सिरसगाव हा रस्ता भोजाजी महाराजांच्या आजनसरा या संत नगरीला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने यवतमाळ, अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातून या मार्गाने येणाºया भविकांची संख्या मोठी आहे, रविवार आणि बुधवारी येथे भाजवकांची प्रचंड गर्दी उसळते. परंतु, अरुंद रस्ता नागमोडी वळणे व रस्त्यांची झालेली चाळण, यामुळे अनेक वाहनांचे टायर फुटून, तर कधी नागमोडी वळणावर वाहनांची धड़क होऊन अपघात ही बाब नित्याचीच झाली आहे.दहा वर्षांपूर्वी या रस्त्याच्या निर्मितीसाठी टाकळी निधा येथील ग्रामस्थांनी जनांदोलन उभारून लोकप्रतिनिधींनो, गावात या आणी हजार रुपए मिळवा! असे आवाहन केले होते. मात्र, याचीही दखल घेण्यात आली नाही.
निधा (टा.), सिरसगाव मार्ग ठरतोय ‘किलर वे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 9:28 PM
निधा टाकळी, सिरसगावसह कान्होली, कात्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक धोकादायक वळणावर आहे. रस्त्यावरील डांबर नामशेष झाले असून, खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची वेळ