लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.येथील पाणीपुरवठ्याची विहीर पूर्ती सिंचन प्रकल्पाच्या नदीकाठच्या अरुण काकडे यांच्या शेतात आहे. पुर्ती सिंचन कालव्यामुळे विहिरीला मुबलक पाणी राहील ही आशा फोल ठरली असून मार्च महिन्यातातच विहीर आचके देते.पावसाळा व हिवाळ्यात दर दिवशी पाणी सोडले जाते मात्र आता विहिरीला पाणी नसल्याने नऊ दिवसाआड पाणी सोडले जाते. घरात पाण्याचा ठणठणाट असल्याने उन्हाळा सुरू झाला तरी कुलर अद्याप सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. विहीर अधिग्रहण करून पाणी समस्या सोङवता येऊ शकते पण काम करण्याची तळमळ व इच्छाशक्तीचा अभाव यामुळे लोकांना चटके सहन करावे लागत आहेत. अधिकारी व ग्रामसेवक विहीर अधिग्रहण करण्याच्या विचाराचे असले तरी पदाधिकारी मात्र उदासीन आहेत.नळ सोडणाऱ्या शिपायाच्या वॉर्डात मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे. त्याच वॉर्डात सरपंच व पाणी पुरवठा सभापतीचे घर आहे त्यामुळे तिथे अधिक काळ नळ सुरु ठेवले जात असल्याची चर्चा असते.
वर्धा जिल्ह्यातील आकोलीत नऊ दिवसांनंतर येते नळाला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:39 AM
आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.
ठळक मुद्देगृहिणी त्रस्त