शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

शेतकरी आरक्षणाचे नऊ ग्रा.पं. मध्ये ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:41 PM

गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यांमध्ये मागणी : महिला सरपंचाचा मोठा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये शेतकरी आरक्षणाची भूमिका विषद करण्यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल उपस्थित होते. झुनका येथे सरपंच अर्चना नारनवरे, रमेश नगराळे, रितेश डुलके, चंद्रकांत मुंगे, शंशाक उरकुडे, सविता नगराळे उपस्थित होते. जीवन थुल, सचिन महले, सुनिल शिंदे, राजकुमार जामुळे, दिपक तामगाडगे, शुभम जामुनकर, वर्षा गराटे यांनी या ठरावाचे समर्थन केले.कोरा येथे जि.प. सदस्य रोशन चौके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ पंढरे, रविंद्र चौधरी, आतिष शंभरकर, प्रशांत डफ, बाबाराव लोखंडे, संदीप कडवे, अरविंद येवले, पं.स. सदस्य वसंत घुमडे, महेंद्र वैरागडे, ज्ञानेश्वर गुंडे, ब्रम्हानंद सुर्यवंशी, मोरेश्वर तिमांडे आदी उपस्थित होते. निंबा येथे उपसरपंच निळकंठ मोहितकर, ग्रा.पं. सदस्य गजानन दांडेकर, सुरेश डायगव्हाणे, प्रभाकर उरकुडे, विठ्ठल खारकर, विनोद पुरी, विमल नारनवरे, ज्ञानेश्वर वानकर, सुधाकर डेहणे, प्रविण गोडबोले, लक्ष्मण कुरडकर आदी उपस्थित होते. सरपंच रेखा उरकुडे यांनी एकमताने ठराव पारित झाल्याची माहिती दिली.कवठा येथे प्रविण जायदे यांच्या पुढाकारातून सभा झाली. यावेळी अरविंद पन्नासे, आशिष खडसे, शंकर भगत, दादाराव घाटे, किशोर केराम, जिवन धारे, साईबाबा भगत, प्रविण आडकिणे, गजानन कष्टी, नरेंश रामटेके, उपसरपंच नितीन माहुरे, प्रफुल ठाकरे, सरपंच रूपाली जायदे आदी उपस्थित होते. उसेगाव येथे श्रीराम वरघणे, संजय कारमेंगे, विलास तिमांडे, रविंद्र चंदनखेडे, किशोर राऊत, राजेराम कंगाले, सुनिता चौधरी, विमल मेंढुले, सुषमा सहारे, सुनिता तलांडे, रामभाऊ महाकाळकर आदी उपस्थित होते. कारंजा तालुक्यातील उमरी येथे गुरूदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने सभा पार पडली. यावेळी ग्रा.पं. सदस्य शेषराव राऊत, विश्वेशवर भक्ते, गजानन डोंगरे, दिलीप चोपडे, किशोर गोहते, देवानंद खंडाईत, धनजरा हिंगवे, बाबाराव राऊत यांनी शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. त्याला मोहन गाखरे, विलास चोपडे, नरेश कासटकर, किशोर देवासे, मिथून ढोबळे, विठ्ठल डोंगरे, देवानंद कामटकर, राहुल भांगे, गजानन हिंगवे आदींनी समर्थन केले. सरपंच भरतराम डोंगरे, उपसरपंच दिलीप देवासे यांनी शेतकरी आरक्षणासंदर्भात घोषणा दिल्या. बोरी येथे पुरुषोत्तम कडवे भागवत डोंगरे, रोशन पोहणकर, अमित गाखरे, दिलीप धोटे, विश्वनाथ किनकर, रामराव बैगने, बालपांडे यांनी आरक्षणाचा ठराव मांडला. त्याला उपसरपंच मनोज धंडाळे यांनी अनुमोदन दिले. सरपंच मिरा हिंगवे यांनी ठराव मंजूर केला. यावेळी पंजाब देशमुख, जनार्दन धोटे, रमेश देशमुख यांनी विधानसभा व लोकसभेत हा ठराव पारित व्हावा असे आवाहन केले.खैरी येथे उपरपंच संजय पाठे यांनी हा ठराव मांडला. याशिवाय मोझरी (शेकापूर) येथेही शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. उपसरपंच शुध्दबुध्द कांबळे, अनिल दुरगे, गजानन ठाकरे, लक्ष्मण अंबाडरे, अशोक थोरात, केशव ठाकरे, दिगांबर गुघाणे, मारोतराव कुसराम, उमेश बोबडे, सुर्यकांत उमरे, रमेश पोहणकर, प्रशांत ससाने, अमोला मुन, राजेंद्र मैत्रे, सदानंद शेळके, शुुभम बरडे, शरद फुलकर, मोहन वाटकर, उमेश चिव्हाने आदी उपस्थित होते. सरपंच पुष्पा येरमे यांनीे समर्थन केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच