महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काळा पैसा बाहेर येईल व देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे सांगत केंद्रातील भाजपा सरकारने वर्षभºयापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त लोकमतने जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा बुधवारी घेतला असता रोकडच्या अल्प पुरवठ्यामुळे आर्थिक व्यवहार प्रभावितच असल्याचे दिसून आले. अनेक एटीएम रोकड तुटवड्यामुळे बंद असल्याचेही दिसून आले. जिल्ह्यातील एटीएमची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्याला प्रत्येक दिवशी सुमारे १० कोटी रुपयांची आवश्यकता असते;पण सध्या केवळ ३ ते ४ कोटी रुपयेच संबंधितांकडून उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कॅशलेस व्यवहारामुळे एटीएमवर वाढला ताणसरकारच्यावतीने कॅशलेस व्यवहार करावे असे आवाहन केले जात आहे. अनेक नागरिक तसे करतही आहेत. मात्र, या व्यवहारामुळे एटीएमवर दिवसेंदिवस तान वाढत असल्याचे काही जानकार सांगतात. एटीएमवरील वाढता ताण कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पावले उचलण्याची गरज आहे.बीओआयचे एटीएम तांत्रिक अडचणीने बंदबँक आॅफ इंडियाचे जिल्ह्यात ३६ एटीएम कक्ष आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर सहा महिन्यांपर्यंत रोकड कमी उपलब्ध होत असल्याने अनेक एटीएम बंद होते;पण सध्या रोकड तुटवडा फारच कमी आहे. रोकड अभावी कुठलेच बँक आॅफ इंडियाचे एटीएम बंद नाहीत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे एटीएम बंद असतील असे सांगण्यात आले.मोठ्या बँकांचे करन्सी चेस्ट उपलब्ध होणे गरजेचेविविध मोठ्या बँकांच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा असल्या तरी केवळ भारतीय स्ट्रेट बँकेचेच करंसी चेस्ट उपलब्ध आहे. बँक आॅफ इंडियाचेही करंसी चेस्ट जिल्ह्यात व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध मोठ्या बँकांना नागपूर येथून रोकड बोलवावी लागत असल्याने काही मोठ्या बँकांचे जिल्ह्यात करंसी चेस्ट उपलब्ध होणे गरजेचे आहे.एटीएममध्ये ३ ते ५ लाख टाकणे क्रमप्राप्तजिल्ह्यात विविध बँकांचे एकूण १५२ एटीएम आहेत. सध्या एटीएममधून दहा हजारापर्यंतची रोकड नागरिकांना सहज काढता येते. परंतु, अनेक एटीएम मध्ये नो-कॅशचा फलक दिसून येत असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. प्रत्येक एटीएममध्ये रोकड टाकण्याची जबाबदारी असलेल्याने प्रत्येक दिवशी त्यात ३ ते ५ लाख रुपये टाकणे क्रमप्राप्त असते असे सांगण्यात आले.उपलब्ध होतात केवळ ५ कोटीबुधवारी लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनदरम्यान जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कक्ष रोकड अभावी बंद असल्याचे दिसून आले. नोटबंदीच्या निर्णयानंतर सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत अतिशय अल्प प्रमाणात रोकड जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. सध्या या निर्णयाला वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु, अजूनही सुमारे १० कोटींची प्रत्येक दिवसाला रोकडची आवश्यकता असताना सध्या केवळ ३ ते ५ कोटीच उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यासाठी सुमारे १० कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील कॅशलेस एटीएमची परिस्थिती सुधारेल असे सांगण्यात आले.नागरिकांना करावी लागते भटकंतीअनेक एटीएम कॅशलेस असल्याने नागरिकांना कॅश असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंतीच करावी लागते. ज्या एटीएममध्ये कॅश आहे तथे नेहमीच नागरिकांची गर्दी असते.कार्ड टू कार्ड ट्रान्झॅक्शन करणारे फारच कमीविविध बँकाच्या बँक ग्राहकांना बँकांनी कॅशलेस आर्थिक व्यवहार करण्यासाठी कार्ड टू कार्ड ट्रांझेक्शन करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेची अनेकांना माहिती असली तरी त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याची माहितीच अनेकांना नाही. परिणामी, जनजागृती करणे गरजेचे आहे. सदर सूविधेचा प्रत्यक्ष वापर करणारे फारच कमी असल्याचे एका बँक अधिकाºयांच्यावतीने सांगण्यात आले.
वर्षपूर्तीनंतरही नो-कॅशचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:08 AM
काळा पैसा बाहेर येईल व देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे सांगत केंद्रातील भाजपा सरकारने वर्षभºयापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देनोटाबंदीचा परिपाक : जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कक्ष कॅशलेसच