लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील १ हजार ५ २५ शाळांमधील २ लक्ष ८२ हजार २८७ बालकांना ही लस देण्यात येणार आहे. या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली विकास भवन येथे मुख्याध्यापकाची बैठक झाली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, डॉ. राज गहलोत , डॉ. निमोदिया, महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी किरण धांदे, शिक्षण विस्तार अधिकारी हजारे उपस्थित होते.जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच शाळा, स्वयंसेवी संस्था, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, वैद्यकिय संघटनांनी सहकार्य करावे. त्यांना दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी. शाळामध्ये बालकांना लसीकरण करतांना वैद्यकिय पथकांचे मोबाईल क्रमांक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देण्यात यावे, मुख्याध्यापकांनी लसीकरण मोहिमेच्या दिवशी १०० टक्के मुलांना उपस्थित ठेऊन लसीकरण मोहिम यशस्वी करावी. बालक साधारण आजारी असले तरी सुध्दा बालकांना लस देण्यात यावी. इंजेक्शनचे डिस्पोजल व्यवस्थित करणे आवश्यक आहे. यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ देता कामा नये, अशा सुचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुख्याध्यापकाच्या बैठकीत दिल्यात. बालकांचे लसीकरण झाल्यावर अर्धा तास बालकांवर लक्ष केंद्रीत करुन काळजी घ्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्यात. धार्मिक प्रमुखांनी समाज बांधवाना मंदिर , मस्जिद, चर्च येथे होणाऱ्या प्रार्थना दरम्यान गोवर रुबेरा लसीकरणाबाबत जनजागृती करावी. यामुळे लसीकरणापासुन एकही बालक सुटणार नाही, असे आवाहन गुल्हाणे यांनी केले. गोवर रोगाचे निर्मुलन २०२० पर्यंत करायचे असून रुबेला रोगावरही नियंत्रण मिळवायचे आहे. भारतातील २१ राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ९ महिने पूर्ण व १५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर-रुबेला लसीचा पहिला डोस देण्यात येईल. ही मोहीम सुमारे पाच आठवडे चालणार आहे. सुरवातीचे दोन आठवडे प्रत्येक शाळेत लाभार्थींना डोस देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवडे शाळेत न जाणाºया लाभार्थ्यांना तर पाचव्या आठवड्यात राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना डोस देण्यात येणार आहे.या लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून ही लस घेतल्यानंतर लाभार्थीचा गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होणार आहे. सर्व पालकांनी ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या आपल्या पाल्यांना ही लस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीला लॉयन्स क्लबचे संचालक डॉ. प्रविण धाकटे, वैद्यकिय संघटनेचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, स्वयंसेवी संघटनेचे सदस्य यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 9:57 PM
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील १ हजार ५ २५ शाळांमधील २ लक्ष ८२ हजार २८७ बालकांना ही लस देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशैलेश नवाल : गोवर रूबेला लसीकरणाचा घेतला आढावा