लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मात्र, लग्न समारंभ व इतर समारंभांतून मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होती. अन्नाच्या या नासाडीला पायबंद घालण्यासाठी फूट सेफ्टी स्टॅण्डर्ड अथॉरिटी आॅफ इंडिया, अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या ‘नो फूट वेस्ट’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात जनजागृतीदेखील केली जात आहे.अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ टन अन्न वाया जाते.यामध्ये २.५० कोटी लोकांना जेवण दिले जाऊ शकते. याची किंमत ५० हजार कोटी इतकी आहे. भारतात एका दिवसात १३७ कोटी रुपयांचे जेवण वाया जाते. अन्न नासाडीच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. एकीकडे भारतात एक तृतियांश लोकांना अन्नाअभावी उपाशी राहावे लागते, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते. अन्नाच्या नासाडीमुळे देशाची आर्थिक आणि सामाजिकदेखील घसरण होते. अन्नाच्या नासाडीला पायबंद घालण्याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापुढे शहरातील प्रमुख हॉटेल्स, रेस्टॉरेंटमध्ये नो फूड वेस्टचे फलक लावण्यात येणार आहेत.या उपक्रमांतर्गत शहरातील काही हॉटेल्समध्ये फलक लावण्यात आले आहेत. कार्यशाळा आयोजनाच्या माध्यमातून याविषयी जागरही केला जात आहे. या उपक्रमाकरिता फलक लॉयन्सकडून उपलब्ध करून दिले जात आहेत.सामाजिक न्यायभवनात उपक्रमाचा प्रारंभअन्न व औषध प्रशासन आणि लॉयन्स क्लबच्या मदतीने सामाजिक न्यायभवनात आयोजित कार्यक्रमात ‘नो फुड वेस्ट’ या उपक्रमाचा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त जयंत वाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अन्नसुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, किरण गेडाम, घनश्याम दंदे, लाळन्सचे अध्यक्ष प्रदीप पशिने, रितुराज चुडीवाले, प्रतिभा वाळके, सुनीता मेहर-तडस आदी उपस्थित होते.जिल्ह्यात मध्यम ते मोठे असे एकूण ३० ते ४० आणि लहान हॉटेल्स अंदाजे ५० आहेत. या सर्व हॉटेल्समध्ये येत्या काळात नो फूड वेस्टचे फलक लावण्यात येणार असून अन्न नासाडी हो नये याकरिता जागर केला जाणार आहे.- जयंत वाणे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, वर्धा.
हॉटेल्समध्ये झळकणार ‘नो फूड वेस्ट’चे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:00 AM
अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ टन अन्न वाया जाते.
ठळक मुद्देएफडीएचा अभिनव उपक्रम : कार्यशाळांतून होतोय जागर