लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंदला वर्ध्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाने शहरातून रॅली काढत ‘नो एनआरसी, नो सीएए’ अशा घोषणा देत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली होती.देशातील नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बहुजन क्रांती मोर्चाने देशभरात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारीला जिल्हास्तरावर मोर्चा काढून निवेदन दिले, तर आज २९ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे वर्ध्यात बहुजन क्रांती मोर्चाला इतरही पक्षासह सामाजिक संघटनांनी सहकार्य करून बंदला प्रतिसाद दिला. सकाळी आंदोलनकर्त्यांनी शहरातून रॅली काढून प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार बाजारपेठेतील काही दुकाने बंद करण्यात आली. सोबतच शहरातील पेट्रोलपंप बंद करून शाळांनाही सुटी देण्यात आली. शहरातील आॅटो, स्कूलबस, ट्रॅव्हल्स तसेच महामंडळाच्या बसही काही काळाकरिता थांबविण्यात आल्या होत्या. शहरात दिवसभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील पावडे चौकात काही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना पोलिसांनी आपला हिसका दाखविला. आंदोलनकर्त्यांनी केवळ धरणे आदोलनाचीच परवानगी घेतली होती. मात्र, त्यांनी शहरातून विनापरवानगी रॅली काढल्याने पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले. या बंदमुळे दुपारपर्यंत शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. सेवाग्राम व पवनार येथेही बंद पाळण्यात आला.देवळीत कापसाचा लिलाव खोळंबलादेवळी : येथे नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून एनआरसीविरोधात नारेबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केले असून त्यांना विविध पक्षांसह समाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला. या आंदोलनाने दुपारी पावणेबारा वाजतापर्यंत कापसाचा लिलाव खोळंबला होता. सध्या शेतकऱ्यांची कापूस बाजारात मोठी गर्दी आहे. बुधवारी बाजारात दहा हजार क्विंटल कापसाची आवक असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी बारा वाजता लिलाव सुरू करण्यात आला. यावेळी उपस्थित कास्तकारांनी एनआरसीबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अयुब अली पटेल, अमोल कसनारे, देवानंद भगत तसेच नगरसेवक पवन महाजन, अब्दुल रहेमान तंवर, किरण पारिसे, बाभूळगावचे सरपंच सचिन बोबडे, प्रमोद ठाकरे, मोहम्मद हारून तंवर, मंगेश पिंपळकर, नदीम शेख व अजझर शेख यांनी केले. या बंदच्या काळात देवळी शहरातील बाजारपेठ मात्र सुरळीत सुरू होती.
नो एनआरसी; नो सीएए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM
देशातील नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बहुजन क्रांती मोर्चाने देशभरात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारीला जिल्हास्तरावर मोर्चा काढून निवेदन दिले, तर आज २९ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते.
ठळक मुद्देबंदला संमिश्र प्रतिसाद : शाळांना सुुटी, दुपारपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट