रामदास तडस : हजरत दिनाशावली मस्जिदकडून जनजागृती कार्यक्रमदेवळी : शरीरातील उर्जा कायम राखण्यासाठी तसेच प्रदूषणमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी ‘नो व्हेईकल डे’ पाळणे गरजेचे आहे. जाती-धर्म-पंथ यावर आधारित मतभेद या गावाने कधीही पाहिले नाही. सर्वच कार्यात मुस्लीम समाजाचे योगदान राहिले. यामुळे या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न राहील, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.हजरत दिनाशावली बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला. कार्यक्रमात मुस्लीम समूदाय व मदरसाच्या मुलांसोबत संवाद साधून दिवसाचे महत्त्व पटवून देण्यात आले. दिनाशावली मस्जीद ट्रस्टच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. तडस तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत, मस्जीद ट्रस्टचे अध्यक्ष ग्यासुद्दीन काजी, मदरसा कमेटीचे अध्यक्ष इफत्तेखार अहेमद, न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, न.प. सभापती दिलीप कारोटकर, न.प. सदस्य अ. नईम, कृष्णकांत शेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, डॉ. श्रावण साखरकर आदी उपस्थित होते. ‘लोकमत’ वृत्त समूहाचा उपक्रम म्हणून सर्वप्रथम खा. तडस यांच्या उपस्थितीत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीची सांगता मस्जीद ट्रस्टच्या प्रांगणात झाली. वाढते प्रदूषण व स्वच्छतेअभावी अनेक आजार बळावत आहे. लोकसंस्थेच्या तुलनेत ६ टक्के लोकांना मधुमेह व ११ टक्के लोकांना हायपरटेंशनच्या आजाराने पछाडले आहे. यासाठी देशभरात पावले उचलली जात आहे. प्रदूषण व आजारांपासून बचाव करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. दिदावत यांनी व्यक्त केले. यावेळी सभागृहाचे लोकार्पण खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले. मदरसा प्राचार्य शराफत अली यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक हरीदास ढोक यांनी केले. संचालन शेख सत्तार यांनी केले तर आभार मोहम्मद शफी यांनी मानले. याप्रसंगी प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेत जनजागृती करण्याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला बाजार समिंतीचे संचालक अयुबअली पटेल, ईशाख शाह, ताहमुल रजा, नोबत खॉ. सत्तारखान पठाण, निसारअली पटेल, युनुसअली पटेल, शेख जमील, समीर शेख, शेख ईस्माईल, फारुख शेख, शेख जुम्मन, अब्दुल कय्युम, कराटेचे जिल्हा प्रशिक्षक अनुप कपूर, किरण ठाकरे, प्रा. पंकज चोरे, आतिष ईटनकर, अद्दू पहेलवान, रसीद शेख, बब्बू पटेल, शिवदास गोडबोेले, अर्जुन पवार, तन्वी कांबळे, साक्षी कांबळे, सौरभ लाडेकर, समीर शाहू, सौरभ राठोड व मदरसाचे विद्यार्थी उपस्थित होते. खा. तडस व सायकल स्वारांनी हजरत दिनाशावली दर्ग्यावर चादर चढवली.(प्रतिनिधी)
प्रदूषणमुक्त समाजासाठी ‘नो व्हेईकल डे’
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM