शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

न.प.उपाध्यक्ष व कृउबा सभापतीवरील अविश्वास बारगळला

By admin | Published: September 27, 2016 2:56 AM

येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम

वर्धा पालिकेत २३ सदस्यांची तासभर सभा : बाजार समितीत ११ सभासदांकडून अर्ध्या तासात फैसला वर्धा : येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावर शिक्कामोर्तब करण्याकरिता सोमवारी पालिका व बाजार समितीच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही ठिकाणी आवश्यक संख्याबळ नसल्याने दोघांवरही आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बारगळला. ३९ सदस्यांच्या असलेल्या वर्धा पालिकेत अविश्वासाकरिता २६ सदस्य संख्याबळ अनिवार्य होते. अविश्वास आणण्यात पुढाकार घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य फुटीर झाल्याने हा प्रस्ताव बारगळल्याचे दिसून आले. सभागृहात केवळ २३ सदस्यांची उपस्थिती असल्याने प्रस्ताव बारगळल्याने कमल कुलधरीया यांचे उपाध्यक्षपद कायम राहिले आहे. असाच प्रकार बाजार समितीत झाला. येथे एका मताने प्रस्ताव बारगळा. अविश्वास प्रस्तावाकरिता १८ पैकी १२ सदस्यांची गरज होती. येथे ११ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने हजेरी लावली. मात्र आवश्यक असलेला एक सदस्य गैरहजर राहिल्याने प्रस्ताव बारगळला. येथे सात सदस्य गैरहजर होते. यामुळे श्याम कार्लेकर हे सभापती पद राखण्यात यशस्वी झाले.(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे तीन, कॉग्रेसचे दोन व बसपचा एक सदस्य गैरहजर ४वर्धा पालिकेत उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला. यामुळे राष्ट्रवादीच्या संपूर्ण सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने उभे राहणे अपेक्षित होते. मात्र येथे तसे झाले नाही. दुपारी १२ वाजता नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेत सभा सुरू झाली. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे व प्रशासकीय अधिकारी अजय बागरे यांची उपस्थिती होती. या सभेला २६ सदस्य हजर राहतील, असे असताना अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या राकाँचे जगदीश टावरी, दिपिका आडेपवार व संतोष ठाकूर सभागृहात पोहोचले नाही. यामुळे आवश्यक संख्याबळ जुळले नाही. राकाँच्या या तीन सदस्यांसह काँग्रेसचे वर्षा खैरकार व शरद आडे तसेच बसपाच्या नगरसेवक रिना सहारे यांच्यासह अपक्ष दीपा अहुजा यांची गैरहजेरी होती. या सहा सदस्यांची अनुपस्थिती या अविश्वास प्रस्ताव बारगळण्यात निर्णायक ठरली. ४अविश्वास आणण्याकरिता असलेल्या या सभेत राकाँच्या त्रिवेणी कुत्तरमारे, सुरेश ठाकरे, श्रद्धा मुरारका, सुनील महंतारे, रमन लालवाणी, शांताबाई जग्यासी तर काँग्रेसच्या गिता मसराम, नलीनी पिंपळे, सोहन ठाकूर, चंद्रशेखर खडसे, आकाश शेंडे, शिला गुजर, माया काळे, प्रफुल्ल शर्मा, सुशील धोपटे, योगिता बागडे, भारती खोंड यांच्यासह बसपाचे निरज गुजर, शेख शबनमबानो शेख सलीम, सचीन चव्हाण यांची उपस्थिती होती. अपक्षांमधून योगिता इंगळे, सिद्धार्थ बुटले, अनिल यादव उपस्थित होते. शिवसेना तटस्थ ४अविश्वासावर असलेल्या या सभेत शिवसेनेच्या नगरसेवक गायत्री रोकडे या तटस्थ होत्या. गैरहजर सदस्यांची तासभर प्रतीक्षा ४दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या सभेतील कामकाजाला १ वाजताच्या सुमारास प्रारंभ झाला. तब्बल तासभर येथे गैरहजर असलेल्या सदस्यांची प्रतीक्षा करण्यात आली. अखेर कोणीच आले नसल्याने सभा सुरू झाली. यावेळी अपक्ष नगरसेवक सिद्धार्थ बुटले व काँग्रेसचे चंद्रशेखर खडसे यांनी सभेत विकास कामात अडसर होत असल्याने हा अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आल्याची भूमिका मांडली. बाजार समितीत एका मताने अविश्वास बारगळला ४वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीवरील अविश्वासावर शिक्कामोर्तब करण्याकरिता समितीच्या सभागृहात सभा आयोजित होती. या सभेत एका मताने अविश्वास बारगळला. अविश्वासाच्या बाजूने १२ सभासदांची गरज असताना केवळ ११ सभासद एकत्र आल्याने श्याम कार्लेकर यांचे सभापतिपद कायम राहिले. ४बाजार समितीत पक्षाशी एकनिष्ठ असल्याच्या कारणाने आलेल्या अविश्वासाच्या सभेला मतदानाच्यावेळी काँग्रेस गटाचे प्रकाश पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे बंडखोर श्याम कार्लेकर आणि सुरेश अळसपूरे गैरहजर होते. या दोन पैकी एक सभासद हजर असता तर हा अविश्वास पारित झाला असता अशी चर्चा समितीच्या आवारात होती. या तीन सदस्यांसह भाजपाचे दत्ता महाजन, पवन गोडे, अर्पणा मेघे व अपक्ष सभासद विजय बंडेवारी यांची अनुपस्थिती होती. ४दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या सभेला पांडुरंग देशमुख, शरद देशमुख, रमेश खंडागळे, सु.रा. मेहेर, कमलाकर शेंडे, जगदीश मस्के, उ.प. झाडे, दिनेश गायकवाड, अरविंद भुसारी, शरद झाडे व वैशाली उमाटे यांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलमले यांनी काम सांभाळले.